TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फुटबॉलमध्ये जळगावचा एकतर्फी विजय, हॉकीत टाय तरी जळगावची सरशी !

विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप ; पोलीस महानिरीक्षकांसह पोलीस अधिकाऱ्यांची असणार उपस्थिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 24, 2023
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नाशिक पोलीस परिक्षेत्र अंतर्गत विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धेअंतर्गत आज शेवटच्या दिवशी जळगाव विरुद्ध नाशिक शहर फुटबॉल सामना चांगलाच चुरशीचा ठरला. जळगाव संघाच्या खेळाडूंनी दमदार खेळाचे प्रदर्शन केल्याने विरोधी संघाला खाते देखील उघडता आले नाही. एकीकडे फुटबॉलमध्ये विजय मिळवल्यानंतर दुसरीकडे हॉकीत देखील जळगाव संघ विजयी ठरला. विजयानंतर पोलीस अधिक्षकांसह सर्व खेळाडूंनी जल्लोष केला.

३४ वी नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा पोलीस कवायत मैदानावर सुरू असून शुक्रवार दि.२४ नोव्हेंबर रोजी दिवसभरात मैदानावर खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केट बॉल, हॅण्डबॉल, स्विमिंग स्पर्धा पार पडल्या तर जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर कबड्डी, धावणे, लांब उडी, अडथळ्यांची शर्यत, उंच उडी, गोळा भेक, भाला भेक, मैदानी खेळ, भारोत्तलन पार पडले. विभागीय क्रीडा स्पर्धेत नाशिक पोलीस परिक्षेत्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण संघ सहभागी झाले आहेत.

READ ALSO

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी शुक्रवारी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांनी परिवारासह हजेरी लावली. तसेच दिवसभरात पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, कृष्णांत पिंगळे, कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, पोलीस गृह उपअधीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस वेलफेअर शाखेच्या रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, डॉ.विशाल जयस्वाल, महेश शर्मा, लिलाधर कानडे, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, दत्तात्रय पोटे आदी उपस्थित होते. उद्या समारोप सोहळ्याला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर, नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह ५ जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवारी पहिल्या सत्रात मैदानी क्रीडा स्पर्धेत मैदानी खेळांमध्ये ५००० मीटर धावणे महिला प्रथम कीर्ती भिसे जळगाव, द्वितीय चंदा मुंडे, तृतीय शितल लोखंडे नाशिक शहर, फुटबॉल जळगाव विरुद्ध नाशिक शहर जळगाव विरुद्ध नाशिक शहर जळगाव विजयी, नाशिक ग्रामीण विरुद्ध नंदुरबार नाशिक ग्रामीण विजयी, हॉकी अंतिम सामना नाशिक शहर विरुद्ध जळगाव जळगाव विजयी ठरले. कबड्डी महिला जळगाव विरुद्ध नाशिक ग्रामीण, जळगाव विजयी पुरुष अहमदनगर विरुद्ध जळगाव विजयी, धुळे विरुद्ध नाशिक ग्रामीण नाशिक ग्रामीण विजयी, खो-खो महिला जळगाव विरुद्ध धुळे सामन्यात धुळे विजयी, नंदुरबार विरुद्ध नाशिक शहर सामन्यात नाशिक शहर विजयी, अहमदनगर विरुद्ध नाशिक ग्रामीण स्पर्धेत नाशिक ग्रामीण विजयी ठरले. पुरुष नाशिक शहर विरुद्ध नाशिक ग्रामीण स्पर्धेत नाशिक ग्रामीण विजयी, अहमदनगर विरुद्ध जळगाव सामन्यात अहमदनगर विजयी, धुळे विरुद्ध नंदुरबारमध्ये नंदुरबार विजयी झाले.

हँडबॉल पुरुष जळगाव विरुद्ध नाशिक शहर नाशिक शहर विजयी, अहमदनगर विरुद्ध नाशिक ग्रामीण नाशिक ग्रामीण विजयी, धुळे विरुद्ध नंदुरबार धुळे विजयी, हॉलीबॉल पुरुष धुळे विरुद्ध नाशिक ग्रामीण धुळे विजयी, नाशिक शहर विरुद्ध जळगाव नाशिक शहर विजयी, महिला नाशिक शहर विरुद्ध अहमदनगर नाशिक शहर विजय, धुळे विरुद्ध नाशिक ग्रामीण धुळे विजयी, बास्केटबॉल पुरुष धुळे विरुद्ध नाशिक ग्रामीण धुळे विजयी झाले.

अथेलेटीक्स पंच म्हणून राजेंद्र जाधव, डॉ.विजय पाटील, प्रा.इकबाल बेग उस्मान बेग मिर्झा, प्रा.वसीम आफताब मिर्झा, डॉ.कांचन विसपुते, निलेश पाटील, सचिन महाजन , योगेश सोनवणे, प्रा.समीर घोडेस्वार, विजय रोकडे, नितीन पाटील, अच्युत काशीद, गिरीश पाटील, गिरीश महाजन यांनी भूमिका पार पाडली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

June 20, 2025
एरंडोल

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

June 20, 2025
गुन्हे

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
गुन्हे

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

June 19, 2025
गुन्हे

बालकाचा गळा चिरुन खून करणाऱ्यांचा पर्दाफाश

June 19, 2025
धरणगाव

धरणगाव नगरपालिका कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी विनोद रोकडे यांची निवड !

June 18, 2025
Next Post

जळगाव जिल्ह्यातील ४५ जणांचे शस्त्र परवाने रद्द ; गैरप्रकारांना बसणार आळा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड तालुक्यात आठवड्याभरात अवैध धंद्यांवर कारवाई

September 3, 2022

दररोज केवळ ७३ रुपये गुंतवणूक करुन मिळवा १० लाख रुपये ; जाणून घ्या..एलआयसी ‘या’ योजनेबद्दल

April 11, 2022

भारतीय महिला टी २० टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौरला कोरोनाची लागण

March 30, 2021

पाच लाखांची मागितली खंडणी ; जळगावात एकाविरुद्ध गुन्हा !

October 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group