TheClearNews.Com
Thursday, October 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय.

जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात.

vijay waghmare by vijay waghmare
April 18, 2026
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी) – जळगाव क्रिकेट लिगच्या कार्यक्रमाचे शानदार उद्घाटन शनिवारी संध्याकाळी झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, जळगाव महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, संचालक अतुल जैन, धुळ्याचे महापौर मायादेवी परदेशी, बाफना ज्वेलर्सच्या नयनतारा बाफना, स्पेक्ट्रमचे दीपक चौधरी उपस्थित होते. यावेळी जळगाव कोगटा किंग्ज संघाचे मालक अतुल कोगटा, जामनेर सातपुडा हिरोजचे किरण बच्छाव, चाळिसगा चॅलेंन्सर्ज संजय भावसार, रावेर रॉयल्स महाविर जैन, विमल जैन, अमळनेर सुहांस जायंट्सचे संदीप काबरा, पाचोरा एसकेटी योद्धाजचे हेमंत कोठारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात अतुल जैन यांनी सन २०१९ मध्ये झालेल्या जेसीएलमधून राष्ट्रीय पातळीवर तसेच राज्य पातळीवर सात ते आठ खेळाडूंनी आपले कौशल्य दाखविले आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवरील पायाभूत सुविधा जैन ड्रीम स्पेसेस च्या भव्य क्रीडांगणावर केल्या गेल्याची माहिती दिली. दरम्यान उपस्थित सर्व मान्यवरांनी स्पेक्ट्रमच्या अलरीक इलेक्ट्रीक्सच्या नवीन दालनाला भेट दिली. यावेळी कंपनीचे लो व्होल्टेज, वायरिंग डिव्हाईस, स्वीच असे प्रोडक्ट लॉंन्च करण्यात आले.

सुरेशदादांनी जागवल्या आठवणी

READ ALSO

विजेचा शॉक लागून ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखाचा मृत्यू

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

माजी मंत्री सुरेशदादा जैन हे उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू होते. मैदानावर त्यांनी जुन्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले, मी इंदूर येथे असताना चांगला क्रिकेट खेळत होतो. माझी रणजी संघातही निवड त्यावेळी झाली होती. विद्यापीठ पातळीवर मी अनेक सामने खेळलो होतो. आता जळगावात अशोकभाऊ व अतुलभाऊ यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी चांगली संधी निर्माण केली आहे. या स्पर्धेतून राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू तयार होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

जळगावचे वानखेडे स्टेडियम म्हणजे जैन ड्रीम स्पेसेसचे क्रीडांगण – गिरीश महाजन

मैदान व आयोजनाबाबत अशोक जैन आणि अतुल जैन यांचे मंत्री गिरीश महाजन यांनी कौतुक केले. ते पुढे म्हणाले, मी परवाच वानखेडे स्टेडीयमवर होतो. ते मैदान पाहिले. त्यापेक्षा जळगावातील मैदान अधिक चांगले झाले आहे. यामुळे आता जळगावातून अनेक चांगले खेळाडू निर्माण होती. सुरेशदादा यांनी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील खेळाडू निर्माण होतील. पुढे बोलताना ते म्हणाले की, शालेय व महाविद्यालयीन काळात ते कुस्ती, कबड्डी आदी खेळांत सक्रिय होते; मात्र एका खेळावर लक्ष केंद्रित केले नाही. त्याचवेळी सुरेशदादा जैन यांनी गिरीश राजकारणाच्या खेळात रंगल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर महाजन पुढे म्हणाले, राजकारणाच्या खेळात मी चांगलाच रंगलो. त्यामुळेच सात वेळा सरपंच, सात वेळा आमदार आणि तीन वेळा मंत्रीपद मिळाल्याचे सांगत
अंतीम सामनातील विजेत्याला दिली जाणाऱ्या ट्रॉफीचे अनावरण
मान्यवरांच्या उपस्थितीत जळगाव क्रिकेट लीगच्या ट्रॉफीचे दिमाखानात उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शानदार सांस्कृतिक कार्यक्रम झाले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

पहिल्याच रोमांचकारी सामन्यात जामनेर सातुपडा हिरोज यांनी ‘अक्षय’ विजय

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 क्रिकेटचा रोमहर्षक संग्रामाला सुरवात झाली. जामनेर सातुपडा हिरोज् व पाचोरा एसकेटी योद्धाज मध्ये झालेल्या पहिल्याच रोमांचकारी सामन्यात जामनेर सातुपडा हिरोज यांनी ‘अक्षय’ विजय नोंदविला. मेहरूण तलाव परिसरातील कांताई नगर येथील जैन ड्रीम स्पेसेस येथील भव्य क्रीडांगणावर सुरू असलेल्या जळगाव क्रिकेट लीगच्या पहिल्या सामन्याचे नाणेफेक जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या हस्ते झाले. जामनेर सातपुडा हिरोज् संघाचे कर्णधार शतायू कुलकर्णी यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलदांजांची निर्णय सार्थ ठरवत रामकृष्णा राठोड यांनी 14 निर्धाव चेंडू टाकत 3 विकेट घेतल्यात. त्याला शतायू कुलकर्णी 3 विकेट ने चांगली साथ दिली. दोघांसह उत्कृष्ठ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर पाचोरा एसकेटी योद्धाजच्या फलंदाजांना 114 रनांवर रोखले. 10 विकेटच्या बदल्यात त्यांनी धावसंख्या केली. यामध्ये 15 चेंडूमध्ये 30 धावा रोहित तलरेजा याने केले. त्याला सिद्धेश देशमूख 28 धावा (36 बॉल) याची संयमी खेळी महत्त्वपूर्ण ठरली. 115 धावांचे लक्ष्य घेऊन फलंदाजी साठी आलेल्या जामनेर सातपुडा हिरोज् च्या फलंदाजांनी आक्रमक खेळ केला. प्रध्दुम महाजन याने 14 चेंडूत 34 धावा कुठल्यात. त्याला ललित पाटील 29 धावा (25 चेंडू), नाबाद क्रिशी नाथानी 33 धावा (23 चेंडू) यांनी विजयी लक्ष्य गाठले. जामनेर 6 विकेट राखुन विजय नोंदविला. पाचोरा एसकेटी योद्धाज तर्फे निलेश पाटील, चारूदत्त नन्नवरे, आर्यन देशमूख यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. रामकृष्णा राठोड याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले. याप्रसंगी किरण बच्छाव, राहुल पवार, अलरीक इलेक्ट्रीकल्स चे वरिष्ठ व्हाईस प्रेसिंटंट प्रविण कुंजीवाल, हेमंत कोठारी, प्रणव कोठारी, एस. टी. खैरनार, राजेंद्र लढ्ढा उपस्थित होते. रोहित तलरेजा व ललित पाटील यांना बेस्ट सिक्स म्हणून गौरविण्यात आले. विजयी जामनेर सातपुडा हिरोज् संघाला 15000 रोख पारितोषिक तर उपविजयी पाचोरा एसकेटी योद्धाज ला 8000 रुपये रोख पारितोषिकाने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे गौरविण्यात आले. सूत्रसंचालन विजयकुमार अय्यर यांनी केले.

उद्याचे सामने
दि. १९ एप्रिल दुपारी ३ वाजेला अमळनेर सुहांस जायंट्स विरुद्ध जळगाव कोगटा किंग.
दि. १९ एप्रिल सायंकाळी जामनेर सातपुडा हिरोज विरुद्ध रावेर रॉयर्ल्स.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJamner Satpura Heroes ‘Akshay’ Vijay

Related Posts

जळगाव

विजेचा शॉक लागून ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखाचा मृत्यू

October 29, 2026
गुन्हे

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

October 28, 2026
गुन्हे

महामार्गाने घेतला १३वा बळी, बायपासवर मृत्यूचे सत्र थांबेना !

October 28, 2026
जळगाव

जेडीसीसीची रणधुमाळी सुरू, पहिल्याच दिवशी ३१४ अर्जाची विक्री

October 27, 2026
गुन्हे

किनगाव दगडफेकप्रकरणी शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

October 27, 2026
जळगाव

महावितरणच्या अभियंत्यांनी जपली सामाजिक बांधिलकी!

October 27, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 19 ते 25 एप्रिल 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य २३ ते २९ मार्च २०२५

March 23, 2025

हरीविठ्ठलनगरचा मुख्य रस्ता घेणार मोकळा श्वास ; उपमहापौर सुनील खडके यांचे नागरिकांना आश्वासन !

December 8, 2020

रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर ; मोफत धान्यासह इतरही अनेक फायदे

January 6, 2022

शहरातील ४ हजार ५०० मालमत्ताधारकांना कोर्टातर्फे नोटीस !

March 17, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group