मुंबई (वृत्तसंस्था) १०वी आणि १२वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. महाराष्ट्र डाक विभागात तब्बल २५७ जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०२१ असणार आहे.
शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वयोमर्यादा
पोस्टल असिस्टंट – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून १२ वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच वयोमर्यादा १८ – २७ वर्षांच्या दरम्यान असावी.
सॉर्टिंग असिस्टंट – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून १२ वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच वयोमर्यादा १८ – २७ वर्षांच्या दरम्यान असावी.
पोस्टमन – उमेदवाराने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच वयोमर्यादा १८ – २७ वर्षांच्या दरम्यान असावी.
मेल गार्ड -उमेदवाराने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच वयोमर्यादा १८ – २७ वर्षांच्या दरम्यान असावी.
मल्टी टास्किंग स्टाफ – उमेदवाराने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून १०वी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच वयोमर्यादा १८ – २५ वर्षांच्या दरम्यान असावी.
इतका मिळणार पगार
पोस्टल असिस्टंट – २५,५०० ते ८१,१०० रुपये प्रतिमहिना
सॉर्टिंग असिस्टंट -२५,५०० ते ८१,१०० रुपये प्रतिमहिना
पोस्टमन – २१,७०० – ६९,१०० रुपये प्रतिमहिना
मेल गार्ड – २१,७०० – ६९,१०० रुपये प्रतिमहिना
मल्टी टास्किंग स्टाफ – १८,००० – ५६,९०० रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ नोव्हेंबर २०२१