TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी बसेसचे कमाल भाडेदर निश्चित

निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जादा भाडे आकारणी केल्यास होणार कारवाई

The Clear News Desk by The Clear News Desk
October 30, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आगामी सणासुदीचा व गर्दीचा हंगाम लक्षात घेता प्रवाशांकडून मोठया प्रमाणात खाजगी कंत्राटी बसेसचा वापर करण्यात येतो. प्रवाशांकडून खाजगी कंत्राटी वाहतूकीची ने-आण करणाऱ्या वाहतूकदारांकडून गर्दीच्या हंगामामध्ये अवाजवी भाडेवाढ करण्यात येते. अशा खाजगी कंत्राटी वाहनांच्या भाडेदरासंदर्भात मुंबई उच्च न्यायालय जनहित याचिका क्र. १४९/२०११ दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेत उच्च न्यायालयाने खाजगी कंत्राटी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचे आदेश शासनास दिले होते.

राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी वाहनांचे कमाल भाडेदर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहनांचे संपूर्ण बससाठी प्रति किलोमीटर भाडेदर त्याच स्वरुपाच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रती किलोमीटर भाडेदराच्या ५०% पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर महाराष्ट्र शासन, गृह विभाग यांचे शासन निर्णय क्र. एमव्हीआर-0412/प्र.क्र.378/(पु.बा.07) परि.2 दि. २७ एप्रिल, २०१८ अन्वये निश्चित करण्यात आले आहे. राज्य परिवहन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, यांचे दिनांक २५ ऑक्टोबर, २०२१ च्या ठराव क्र.02/2021 नुसार एस.टी.महामंडळाच्या प्रवासी बसेसकरीता असलेल्या भाडेदरामध्ये १७.१७% वाढ करण्यात आलेली आहे.

READ ALSO

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

जळगाव शहरातून खाजगी बसेस या पुणे, मुंबई, नागपूर, सुरत, अहमदाबाद या ठिकाणी ये-जा करीत असतात. या कार्यालयाव्दारे खाजगी ट्रॅव्हल्स मालकांना प्रवशांकडून किती भाडे आकारावे याबाबतचा तक्ता तयार करुन प्रवाशांच्या सोयीकरीता प्रत्येक खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयात फलक लावणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवाश्यांचा माहितीकरिता या तक्त्यात नमुद असलेल्या भाडेदरास एकुण आसनक्षमतेने भागीतले असता प्रती आसन, प्रती प्रवाशी असा भाडेदर निश्चीत करता येईल.

तरी कोणत्याही खाजगी वाहतूकदाराकडून (खाजगी ट्रॅव्हल्स) कंपनीकडून महाराष्ट्र शासन, गृह विभाग यांचे शासन निर्णय क्र. एमव्हीआर -0412/प्र.क्र.378/ (पु.बां.07)/परि.2 दि. २७ एप्रिल, २०१८ अन्वये निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जादाभाडे आकारणी केल्याबाबत तक्रार mh१९@mahatranscom.in व dycommr.enf२@gmail.com या संकेतस्थळावर करावी. तसेच अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित वाहतूकदारावर मोटार वाहन कायदा १९८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधित नागरिक व खाजगी ट्रॅव्हल्स वाहतूकदार यांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
जळगाव

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

July 9, 2026
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
जळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

July 8, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
जळगाव

राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण

July 7, 2026
Next Post

राज ठाकरे यांनी केली कोरोनावर मात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाच हजारांची लाच भोवली : एरंडोल तहसीलच्या गोदाम किपरसह मुकादम जळगाव एसीबीच्या जाळ्यात !

November 13, 2024

फडणवीस आक्रमक ; काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बड्या मंत्र्यांविरोधात थेट हक्कभंग दाखल

March 10, 2021

ताणतणाव मुक्ति भव्य मानसिक आरोग्य शिबीराचे पालकमंत्र्याच्या हस्ते शुभारंभ

February 6, 2021

अजित पवारांना कोरोनाची लागण नाही : पार्थ पवार

October 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group