धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कल्याणे बु. येथून शेतातील विहिरीतून पाण्याची मोटार चोरीला गेली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, दि. ११ ते १२ जानेवारीच्या दरम्यान कल्याणे बु. शिवारातील शेत गट नं. ५६ / ३ मधील विहिरीमधील साडेतीन हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रिक पाण्याची मोटार (५ एचपी) अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे. या प्रकरणी सुहास रमेशचंद्र धुप्पड (रा. जळगाव) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ खुशाल पाटील हे करीत आहेत.
















