जळगाव (प्रतिनिधी) : विजयी भव, तुम्ही खासदार होणारच असे शुभाशिर्वाद कष्टभंजन विर हनुमान मंदिराचे रामदासजी महाराज यांनी महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांना दिले.
श्री हनुमान जयंतीनिमीत्त पिंप्राळातील शंकरआप्पा नगरातील कष्टभंजन विर हनुमान मंदिर येथे करणदादा पाटील यांनी भेट देवून कष्टभंजन विर हनुमान, श्री महादेवाचे दर्शन तर संत रामदासजी महाराज यांचे आशिर्वाद घेतले.
याप्रसंगी, कष्टभंजन विर हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब सोनार, मंदिराचे पुजारी गोपाल जोशी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, जिल्हा उपाध्यक्ष मयूर चौधरी, कैलास पाटील, प्रतापसिंग पाटील, डॉ. महेंद्र पवार, दगडू पाटील, हिलाल पाटील, बापू महाजन, रघुनाथ पाटील, आनंदा कापसे, भैया राजपूत, आनंदा जाधव, संतोष आहीरराव, उमेश चव्हाण, चंदन वाघ, प्रशांत पाटील, दिलीप पाटील, योगेश जाधव, भैया वाघ, विशाल कुरकुरे यांसह कष्टभंजन हनुमान मंदिर मित्र मंडळ, जय हिंद मित्र मंडळ आणि पिंप्राळातील शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.