जळगाव (प्रतिनिधी) भाजपच्या वाटेवर असलेले आमदार एकनाथराव खडसे यांना दाऊद इब्राहीम गॅगच्या नावाने धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला होता. यावर आपण अशा धमक्यांना कधीही भिक घातलेली नाही. परंतू हा प्रकार खोडसाळपणाचा असल्याचेही खडसे यांनी सांगितले.
खोडसाळपणाचाही असू शकतो प्रकार !
या संदर्भात एकनाथराव खडसे यांच्यासोबत संपर्क साधला असता आपण अशा धमक्यांना कधीही भिक घातलेली नाही. हा प्रकार खोडसाळपणाचा असू शकतो. परंतू तरी देखील पोलिसांनी सखोल तपास केला पाहिजे,असेही खडसे यांनी सांगितले. खडसे यांना आलेले धमकीचे फोन हे अमेरिका,युपी, देहरादून येथून आले फोन आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. परंतू सॉफ्टवेअरच्या मदतीने अशा पद्धतीने वेगवेगळ्या जागांवरून फोन केले जाऊ शकतात,अशीही माहिती समोर येत आहे. दरम्यान, खडसे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये घर वापसी करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर खडसे यांना मिळालेल्या धमकीमुळे या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
जाणून घ्या…खडसे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलेय !
आमदार एकनाथराव खडसे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून त्यांना दि. १५ आणि १६ एप्रिल रोजी फोन करण्यात आले. त्यात बोलणारे व्यक्ती खडसेंना म्हणाले की, हम दाउद इब्राहिम कासकर के आदमी है हम…….. को मार डाला, अब तुम छोटा शकील को मार डालो, नही तो तुमारी खैर नही, अशी धमकी दिली. त्यावर खडसे यांनी विचारले की, तुम जो ये दाउद शकील नाम ले रहे हो. ये कोण है?, मै पहचानता नही. त्यावर समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने दाऊद, शकील ये डॉन है, और तुमको मार देंगे, असे बोलून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एकनाथराव खडसे यांनी चौघं मोबाईलवरून धमकी देणाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल देईली असून पुढील तपास सपोनि संदीप दुनगहु हे करीत आहेत.