वर्धा (वृत्तसंस्था) चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोरट्यांनी धारदार पावशीने डोक्यावर वार करीत झोपेत असलेल्या वृद्धाची निर्घृण हत्या करत कपाटातील एक लाखांची रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना देवळी तालुक्यातील गिरोली येथे मध्यरात्री घडली. अरुण किसन डहाके (६०) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
गिरोली येथिल अरुण डहाके हे दन शेतकरी असून त्याचा मुलगा भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. दि. रोजी डहाके यांची पत्नी शोभा ह्या वर्धा येथे पत्नी मुलीकडे गेल्या होत्या. मुलगा प्रविण व त्यांची पत्नी, मुले दुसऱ्या खोलीमध्ये रात्री ११ वाजता झोपण्यासाठी नेहमी प्रमाणे निघून गेले. तर मृतक अरुण रात्री १० वाजताच जेवण करून दुसऱ्या खोलीत झोपले होते. शनिवारी पहाटे मृतक अरुण यांचा नातू पहाटे पाच वाजता शौचालयात जाण्यासाठी उठला असता त्याला आजोबा रक्ताच्या थारोळ्यात दिसले.
भेदरलेल्या मुलाने लागलीच वडिलांना उठवले. त्यांनी लागलीच पोलिस पाटील स्मीता थूल यांना घरी बोलवले. पोलिस पाटील थूल यांनी देवळी पोलिस स्टेशनला या संदर्भात माहिती दिली. थोड्याच वेळात देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार भानुदास पिदुरकर हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
रोख रक्कम एक लाख रुपये व सोन्याचे दागिने चोरी गेल्यांचे पोलिसांचा अंदाज आहे. चोरट्यांचा अद्याप कोणताच सुगावा लागला नाही. घरात रोकड आणि सोने-चांदीचे दागिने असल्याची माहिती चोरट्यांना असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. चोरट्यांनी कपातील अंदाजे एक लाख रुपये चोरट्यांनी पळविल्याचे समोर आले आहे.
अज्ञात मारेकऱ्याने अरुण डहाके यांच्या मानेवर व कपाळावर जबर घाव केले असता पावशीचा तुकडा त्यांच्या मानेत फसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. एवढेच नव्हे तर, त्यांच्या शरीरावर १३ ते १४ घावांच्या जखमा दिसून आल्या. त्यामुळे ही हत्या अत्यंत कूरपणे करण्यात आल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान, मृतक यांचे गावात कुणाशीही संबंध खराब नव्हते. तरी देखील त्यांची निर्घृण हत्या झाल्याने गिरोली गावात एकच खळबळ उडाली आहे.