भुसावळ प्रतिनिधी । येथील मध्य रेल्वे प्रशासनकडून शेतकरी लोकांच्या मागणीचा विचार करून देवलाली–मुजफ्फरपुर किसान पार्सल गाड़ी 31 दिसंबरपर्यंत चालवली जाणार आहे.
या गाड़ीचा प्रतिसाद पाहून गाड़ीचे संचालन हे वाढविण्यात आले आहे. सदर गाड़ी ही सप्ताह मधून 3 दिवस चालवली जाणार आहे गाड़ी क्रमांक – 00107 डाउन देवलाली – मुजफ्फरपुर किसान पार्सल गाड़ी ही मंगलवार , गुरुवार , शनिवार या दिवशी देवलाली स्टेशन हुन 18.00 वाजता प्रस्थान करुन रविवारी सकाळी 04.45 वाजता मुजफ्फरपुर स्टेशन ला पोहचेल. गाडी क्रमांक 00108 अप मुजफ्फरपुर ते देवळाली ही गाडी प्रत्येक सोमवार , गुरुवार , शनिवार रोजी प्रस्थान स्टेशन हुन 08.00 वाजता प्रस्थान करून सोमवारी 17.45 वाजता देवळालीला पोहोचल.
सदर शेतकरी लोकाना त्यांचा माल बुक करण्यासाठी त्याना माल पॅक करून हा आपल्या जवळ पासच्या पार्सल ऑफिसमध्ये आणावा लागेल. सोबत आधार कार्डची झेरॉक्स ठेवावी लागेल . शेतकरी ,कार्गो एग्री ग्रेटर , व्यापारी ,बाजार समिती , आणि लोडर्स, याना आपल्या जवळपासच्या स्टेशन मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्या कड़े संपर्क करावा लागेल. रेल प्रशासन शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले की जास्तीत जास्त पणे या गाडीचा उपयोग घ्यावा.