जळगाव (प्रतिनिधी) येथील के के ऊर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.
प्रा. अकिल खान यांच्या अध्यक्षतेखाली मतदाता दिवस संपन्न झाला. अकिल खान यांनी अध्यक्षीय भाषणात लोकशाहीत मतदानाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. राज्यशास्त्र विभाग प्रमुख मुश्ताक भिस्ती यानी ‘आमचा मत आमची ताकद या विषयाला अनुसरून विचार व्यक्त केले. बी. एल. ओ मज़रोद्दीन शेख, इम्रान खान यांनी १८ वर्ष वय पुर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव समाविष्ट कसे करतात या विषयावर मार्गदर्शन केले. तन्वीर जहा शेख यानी निष्पक्ष, व प्रलोभन मुक्त, तसेच काम करणारे व्यक्ती ,नेतृत्व गुण, या विषयावर माहिती देताना प्रलोभनात न पडता मतदान करून लोकशाही मजबूत करावी असे विचार व्यक्त केले. यावेळी उपस्थितांना लोकशाही बळकटीसाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा देण्यात आली. सुत्र संचलन शाह ज़ाकीर यांनी केले तर आभार असमा शेख यांनी व्यक्त केले. शेख तबरेज़ यानी परिश्रम घेतले.
















