TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जाणून घ्या…एका क्लिकवर जळगाव जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचा निकाल !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 30, 2023
in अमळनेर, जळगाव, धरणगाव, पाचोरा, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले होते. त्यातील जळगाव, अमळनेर, पाचोरा, बोदवड, यावल, धरणगाव या ६ बाजार समित्यांचे निकाल समोर आले आहेत. या निकालातून अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. तर अनेकांनी आपापले गड शाबूत ठेवले आहेत.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय !
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवून ११ जागांवर विजय मिळवत भाजपा-शिवसेना शिंदे गट युतीचा पराभव केला. यात महायुतीला ६ जागांवर समाधान मानावे लागले. तर एक अपक्ष उमेदवाराने देखील बाजी मारली आहे. भाजपाने ६ तर शिंदे गटाने १२ जागांवर निवडणूक लढली होती. भाजपाने यातील ४ जागा राखुन वर्चस्व कायम ठेवले असले तरी शिंदे गटाला १२ पैकी अवघ्या दोन जागा जिंकता आल्या आहेत. जळगाव कृउबात दिग्गजांना पराभवाची धुळ चाखावी लागली आहे. त्यात शिंदे गटाचे तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, तरसोदचे पंकज पाटील, विद्यमान संचालक अनिल भोळे, मनोहर पाटील, शशिकांत बियाणी तसेच पंचायत समितीच्या माजी सभापती ललीता पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

READ ALSO

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

पाचोऱ्यात बाजार समितीत त्रिशंकु !

पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक मतमोजणी सुरूवातीपासून शेवटपर्यंत उत्कंठता निर्माण करणारी ठरली. १८ जागांपैकी ९ जागांवर विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्या पॅनलने विजय मिळवला तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलिप वाघ, शिवसेना उबाठाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीला ७ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपा प्रणित अमोल शिंदे गटाला २ जागांवर समाधान मानावे लागले आहेत. यामुळे पाचोऱ्यात बाजार समितीत त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुमत कुणालाच मिळाले नसल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी आता आजी माजी आमदारांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष बघावयास मिळणार आहे.

सोसायटी सर्वसाधारण मतदार संघातील विजयी उमेदवार
गणेश पाटील (६०६ शिंदे सेना युती), सतिष शिंदे (६०४ भाजपा), प्रशांत पवार (५९७ माविआ), प्रकाश पाटील (५६९ शिंदेसेना युती), शामकांत पाटील (५२४ माविआ), मनोज महाजन (४८४ माविआ), विजय पाटील (४७६ माविआ), सोसायटी सर्वसाधारण महिला राखिव मतदार संघाच्या २ जागांमध्ये चुरशीची लढत होऊन पुनमपाटील (शिंदेसेना युती ६९७) तर दुसऱ्­या जागेसाठी शिंदेसेना युती गटाच्या अर्चना संजय पाटील व भाजपाच्या सिंधुताई शिंदे यांच्यात चुरशीची लढत झाली. यात काही मतांनी सिंधुताई शिंदे (५६८) या निवडून आल्याची चर्चा सुरू असतांना पुन्हा मततपासणीची मागणी झाली. यासाठी प्रत्यक्ष उमेदवार हवा, असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले. यात अर्चना संजय पाटील या १४ मतांनी पराभूत झाल्या. यात ६७ मते अवैध ठरली. सोसायटी इतर मागासवर्ग मतदार संघाच्या १ जागेसाठी माविआचे उध्दव मराठे (५७९ मते) विजयी झाले असून विश्वासराव भोसले हे पराभूत झाले. या मतदार संघात १२७ मते अवैध ठरली.

सोसायटी भटक्या विमुक्त जाती जमाती एक जागेसाठी माविआचे गणेश परदेशी व शिंदेसेना युतीचे लखिचंद पाटील यांच्यात लढत होउन लखीचंद पाटील हे ५४१ मतांनी विजयी झाले. या जागेच्या मतमोजणी आणि मतातील फरकाबाबत गणेश परदेशी यांनी हरकत नोंदवली होती. त्यांना ५२७ मते मिळाली तर ९७ मते अवैध ठरली. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघाच्या २ जागांमध्ये माविआचे निलकंठ पाटील (४५९) व शिंदेसेना भाजपाचे सुनिल पाटील (४३६) हे विजयी झाले. यात ६६ मते अवैध ठरली. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक ऐका जागेत माविआचे शरद पाटील यांना पराभूत करून शिंदेसेना युतीचे राहुल पाटील(४४९) हे विजयी झाले आहेत. तर १०५ मते अवैध ठरली.

अमळनेर बाजार समितीत महाविकास आघाडीने मारली बाजी !

आ. अनिल भाईदास पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील यांची रणनीती फलित म्हणून अत्यंत चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीने ११ जागा मिळवत एक हाती सत्ता स्थापन केली आहे. माजी आ. स्मिता वाघ आणि शिरीष चौधरी यांच्या भाजपप्रणित आपले शेतकरी पॅनलला केवळ चारच जागेवर समाधान मानावे लागले, तर एका अपक्षाने बाजार समितीत बाजी मारली आहे. शेतकरी शोषणमुक्त पॅनलला भोपळाही फोडता आला नाही. व्यापाऱ्­यांच्या दोन जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत.

स्मिता वाघ, अशोक पाटील, प्रा. सुभाष पाटील, सुरेश पाटील, अशोक हिंमत पाटील, नितीन पाटील, भोजमल पाटील, सुषमा देसले, पुष्पा पाटील, समाधान धनगर, डॉ. अनिल शिंदे, प्रफुल्ल पाटील, सचिन पाटील, हिरालाल पाटील, भाईदास भिल, शरद पाटील, वृषभ पारख, प्रकाश वाणी हे उमेदवार बाजार समितीवर संचालक म्हणून विराजमान झाले आहेत. यात महाविकास ११ जागा पटकावून एक हाती सत्ता स्थापन केली आहे. भाजप चार, अपक्ष एक उमेदवार निवडून आले आहेत.

उमेदवारांना मिळालेली मते !
सोसायटी मतदार संघ- विजयी- स्मिता वाघ (७२६), अशोक आधार पाटील (७२१), प्रा. सुभाष पाटील (६५६), सुरेश पाटील (५०७), अशोक हिंमत पाटील (४२१), नितीन पाटील (४०९), भोजमल पाटील (३९४). पराभूत उमेदवार- अरूण देशमुख (१४), गणेश पवार (२३), दिनेश पवार (३२२), अनिता पाटील (२६०), केशवराव पाटील (१५६), जिजाबराव पाटील (३४०), जितेंद्र पाटील (३७७), दीपक पाटील (२८४), नारायण पाटील (१५), नितीन पाटील (४०९), पराग पाटील (२६६), भटू पाटील (२५), संदेश पाटील (२१), ज्ञानेश्­वर पाटील (५), गोकूळ बोरसे (३७५), रमेश बोढरे (१०), नामदेव महाले (०८), महेंद्र महाजन (२५३), राजेंद्र माळी (१७), राकेश मुंदडा (३२८), या मतदारसंघात ७४ मतपत्रिका अवैध ठरविण्यात आल्या.

यावल कृउबात भाजपा-सेना युतीचे १५ उमेदवार विजयी !

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदासाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपा- सेना- रिपाई (आठवले गट) प्रणित शेतकरी विकास पॅनलने १५ जागा पटकावून दणदणीत विजय संपादन केला आहे.तर राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) यांच्या महाविकास आघाडीला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

विजयी उमेदवार मतदार संघनिहाय मिळालेली मते
सहकारी सेवा संस्था मतदार संघात (सर्वसाधारण ) सहकार पॅनलचे हर्षल गोविंदा पाटील (३११) , दीपक नरोत्तम चौधरी (३१०) , उमेश प्रभाकर पाटील (३०८) , राकेश वसंत फेगडे (२९९) , सागर राजेंद्र महाजन (२९४) , पंकज दिनकर चौधरी (२८९) ,संजय चुडामन पाटील (२८२), इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये नारायण शशिकांत चौधरी (३९४) , महिला राखीव कांचन ताराचंद फलक (३५१) , राखी योगराज ब-हाटे (३३२) , भटक्या विमुक्त जाती जमाती व विमा प्रवर्ग उज्जैन सिंग भाऊलाल राजपूत (३२४),
ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण प्रवर्गमध्ये विलास चंद्रभान पाटील (२९७) , सूर्यभान निंबा पाटील (२९६), अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग – दगडू जनार्दन कोळी (३२५),आर्थिक दुर्बल घटक प्रवर्ग यशवंत माधव तळेले (३२१), व्यापारी आडते मतदार संघ महाविकास आघाडीचे अशोक त्रम्ब्यक चौधरी(१८८) ,सैय्यद युनूस सैय्यद युसुफ (१६७) , तरहमाल मापाडी तोलारी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सुनील वासुदेव बारी(४६०) उमेदवार विजयी झाले आहेत.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राखला गड !
सकाळी मतमोजणी सुरु झाल्यानंतर प्रारंभी प्रचंड चुरशीची वाटणारी धरणगाव बाजार समितीची निवडणूक दुपारपर्यंत मात्र, एकतर्फी झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या महायुतीच्या पॅनलने १८ पैकी १२ जागांवर विजय मिळवीत स्पष्ट बहुमत मिळवले आहे.

जाणून घ्या…सर्व विजयी उमेदवारांची नावं आणि मिळालेली मते !

सोसायटी मतदार संघ
चौधरी सुरेश सीताराम (५५५), पवार सुनील दत्तात्रय (५३२), पाटील सुदाम शेनपडू (५१७), पाटील जिजाबराव गिरधर (५१५),पाटील किरण शांताराम (५०६), पाटील रघुनाथ धुडकू (५०७), पाटील रंगराव दोधू (५०३)
महिला राखीव
पाटील लताबाई गजानन (५१९), पाटील रेखाबाई ईश्वर (४९७),

ओबीसी
पाटील रमेश माणिक (६२८)

एनटी संवर्ग
धनगर दिलीपराव उत्तमराव (५७७)

ग्रामपंचायत सर्वसाधारण
चौधरी सुरेखा देविदास (४८५),पाटील रवींद्र भिलाजी (४४१)

एससी संवर्ग
पवार संजय जुलाल (५०३),

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक
पाटील प्रेमराज परशुराम (४९०)

व्यापारी मतदार संघ
कर्वा नितीन नंदलाल (१५३),काबरे संजय रमेश (१४४),

हमाल मापाडी मतदार संघ
माळी ज्ञानेश्वर वसंत (१९९)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार १ मे २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘प्रत्येक नेता उठतो हे सरकार पडणार असं सांगतो’ ; पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा आहेर

October 15, 2021

Breaking News : पालघर – अमळनेर बसला अपघात ; पाच प्रवाशी जखमी !

August 25, 2022

जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय पॅनल उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला ; ना. गुलाबराव पाटील

August 30, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

December 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group