जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रामदेववाडी गावाजवळील रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरचे दरवाजाचे सील तोडून अज्ञात चोरटयांनी कंटेनरमधील ३ लाख ३६ हजार रुपये किंमतीचा माल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. ४ ते ५ फेब्रुवारी २०२२ रोजी वाजेच्या सुमारास रामदेववाडी गावाजवळील रस्त्यावर अज्ञात चोरट्याने रामदास साहेबराव खैरनार (वय ४५, रा. खूपचंद साहित्य नगर, मोहाडी रोड, जळगाव) यांच्या कंपनीचे कंटेनर बंद पडल्यामुळे ट्रकवरील चालक हा त्यात झोपलेला होता. अज्ञात चोरट्याने गाडीचे दरवाजाचे सील तोडून २,५६,००० रुपये किंमतीचे बिजस्टोन कंपनीचे ट्रकचे १०००×२० साईजचे नवीन १४ नग टायर की.अं, ५०,००० रुपये किंमतीचे बिजस्टोन कंपनीचे ट्रकचे १०००×२० साईजचे नवीन १४ नग टयुब की.अं, ३०,००० रुपये किंमतीचे बिजस्टोन कंपनीचे ट्रकचे १०००×२० साईजचे नवीन १४ नग फ्लॅप की.अं, असा एकूण ३ लाख ३६ हजार रुपये किंमतीचा माल चोरून नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन मुंडे करीत आहेत.
















