धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील दोनगांव येथे स्व. जिजाबाई राधो पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त समाज प्रबोधनकार ह.भ. प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम दि. १२ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
ह.भ. प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनाला प्रमुख अतिथी म्हणून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच सर्वांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हेमंत राघो पाटील आणि किशोर राघो पाटील यांनी केले आहे. दरम्यान, कीर्तन कोरोनाचे सर्व नियम पाळून होणार आहे.
















