जळगाव (प्रतिनिधी) आज पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण शिबिराचा शुभारंभ पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. रावलाणी, यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर या शिबिरास जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक दीपक पटवे यांनी भेट दिली.
दुपारी २.०० वाजेपर्यंत १५३ पत्रकार नोंदणीसाठी आले होते. तर आतापर्यंत ९० पत्रकारांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत.