जळगाव (प्रतिनिधी) टॅलेंट सर्च क्रिकेट अकॅडमी व टॅलेंटेन क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित एलसीपीएल लिटिल चॅम्प प्रीमियर लीग टी 10 व 16 वर्षा आतील क्रिकेट स्पर्धेचा उद्या शुभारंभ होणार आहे. तत्पूर्वी टॅलेंट सर्च अकॅडमी आयोजित या स्पर्धेसाठी शहरातील एकूण 235 खेळाडूंनी निवड चाचणीमध्ये सहभाग घेतला होता.
निवड चाचणीमध्ये 192 खेळाडूंची सराव सामन्यासाठी निवड करण्यात आली होती. या सराव सामन्यांमधून 120 खेळाडू हे बोली प्रक्रिया घेण्यात आले होते. यातून ९६ खेळाडू सोल्ड झाले असून, हे खेळाडू 14 वर्षा आतील चार संघ व 16 वर्षातील चार संघ अशा पद्धतीने खेळणार आहेत. वरील स्पर्धा ही youtube लाईव्ह असून, लहान मुलांसाठी असलेली खानदेशातील ही सर्वात मोठी स्पर्धा ठरणार आहे. या स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक विनोदभाऊ तायडे हे असून 8 संघ मालक खालील प्रमाणे आहेत.
या स्पर्धा जळगावत होत असून या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी टॅलेंट सर्च क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष व टॅलेंटे 10 क्रिकेट फेडरेशनचे सचिव पंकज महाजन तसेच त्याचे सहकारी विशाल शिरसाठ सर, योगेश महाजन सर, कुमारी एकता भावसार, निखिल दुरुंडे तसेच टेक्निकल कमिटीमध्ये विंचुरकर साहेब, निवृत्ती पाटील, सुधीर पाटील, कनाडे साहेब, विशाल खडके यांनी मेहनत घेतली आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी टॅलेंट10फेडरेशनचे अध्यक्ष महेशजी शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
या स्पर्धेतून खानदेशचे प्रथम BCCI प्रशिक्षक पंकज महाजन यांचा दर्जेदार खेळाडू घडवण्याचा ध्यास आहे. पंकज महाजन हे गेम मेथड पद्धत मुलं घडवण्यासाठी महत्त्वाची आहे, असे मानतात. यासाठी ते खेळाडूंना सर्वच फॉरमॅट उपलब्ध करून देतात. ह्या वेळेस LCPL ऑक्शनच्या माध्यमातून त्यांनी खेळाडूंना फास्ट क्रिकेटचा अनुभवासाठी टी-टेन एलसीपीएल क्रिकेटच्या विश्वाशी ओळख करून दिलेली आहे. उद्यापासून हे सामने सुरू होणार आहेत .