जळगाव (प्रतिनिधी) आमदार संजय सावकारे (Sanjay Saavkare) यांची कार (car) परिवहनमंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांच्या नावावर ट्रान्सफर (Transfer) केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे परिवहन विभागानेही चौकशी सुरू केली आहे. परंतू मागील चार दिवसापासून सुरु असलेली चौकशी म्हणजे नुसता फार्स तर नव्हे असा संशय आता व्यक्त केला जात आहे. कारण कार ट्रान्सफरचे चलन ज्या अकाऊंटमधून भरले तोच अकाऊंटधारक या सर्व षड्यंत्राचा मुख्यसूत्रधार आहे, हे माहित असूनही त्याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा जळगाव ‘आरटीओ’ कार्यालयात सुरु आहे.
कार ट्रान्सफरची फी ज्या अकाऊंटमधून भरली ‘तोच’ मुख्यसूत्रधार !
‘आरटीओ’च्या नियामाप्रमाणे प्रत्येक गोष्टीसाठी विशिष्ट फी आकारणी केली जाते. उदा: नवीन लायसन्स बनविणे, नुतनीकरण करणे. त्याच प्रमाणे कुणाला कार ट्रान्सफर करायची असेल तर त्यासाठी देखील फी अर्थात चलन आकारले जाते. त्यानुसार आमदार संजय सावकारे यांची कार परिवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर करताना देखील हे चलन भरावे लागले असेल. अगदी हे चलन भरल्याशिवाय कार ट्रान्सफर होणे शक्यच नाही. त्यामुळे ओटीपी ज्या नंबरवर आला तो व्यक्ती नव्हे तर ज्या खात्यावरून चलनाचे पैसे वर्ग झाले तो व्यक्तीच या षड्यंत्राचा मुख्यसुत्राधार आहे, हे उघड आहे.
चलन फक्त ऑनलाईनच भरण्याची सुविधा
‘आरटीओ’तून कुठलेही शासकीय काम करायचे असेल तर त्यासाठीचे चलन ऑनलाईनच भरावे लागते. ऑफलाईन म्हणजेच कॅश चलन भरण्याची सोयच नाहीय. त्यामुळे आमदार संजय सावकारे यांची कार परिवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर करतांना चलनाची रक्कम ही कुणाच्या तरी खात्यातूनच भरली गेली असेल. अगदी ज्याने हे पैसे भरले तोच या सर्व प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असेल, हे उघड आहे. त्यामुळे मुंबईच्या समितीचा चौकशीचा निव्वळ फार्स सुरु असून ‘त्या’ व्यक्तीकडे मुद्दाम दुर्लक्ष ? तर केले जात नाहीय, अशी जोरदार चर्चा सुरु आहे.
जाणून घ्या…कसा झाला ओटीपीचा खेळ? आणि काय झाले त्यादिवशी हॉटेलमध्ये ?
ऑनलाईन पोर्टलवर सावकारे यांचा मोबाईल नंबर काढून जो दुसरा नंबर अपलोड करण्यात आला आहे तो नंबर अशोक विठ्ठल पाटील या एजंटचा आहे. २२ डिसेंबर रोजी एजंट प्रशांत जगन्नाथ भोळे उर्फ पप्पू भोळे याने शहरातील एका हॉटेलमध्ये अशोक पाटील यांना सोबत नेले होते. तसेच यावेळी आपला अकिल नामक माणूस फोन उचलत नाहीय. त्यामुळे तुमच्या नंबरवरून फोन लाव असे अशोक पाटील यांना सांगितले. त्यानुसार आपण फोन लावून दिला आणि त्याच वेळात ओटीपीचा खेळ झाल्याचे अशोक पाटील यांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर यात माझा काहीही संबंध नाही, आपल्याला यात गोवण्यात आल्याचा दावा श्री. पाटील यांनी केला आहे. त्यामुळे संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज मिळवल्यास या षड्यंत्राचा एका मिनिटात होईल पर्दाफाश होईल.
गायब झालेली कागदपत्रे ‘त्या’ अॅप्लिकेशन नंबरवरून मिळवणे सहज शक्य !
जळगाव आमदार संजय सावकारे यांची कार परिवहन मंत्र्यांच्या नावावर हस्तांतरण करण्याच्या प्रकरणात सुरुवातीला या कारवरील कर्जाचा बोजा कमी करण्याचे प्रकरण सादर करण्यात आले. त्यासोबत जी कागदपत्रे जोडण्यात आली होती, ती आता गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. परंतू ही कागदपत्र मिळवणे सहज शक्य आहे. कारण ‘आरटीओ’ट कुठलेही काम करताना एक अॅप्लिकेशन नंबर जनरेट होतो. हा नंबर ग्राहकाला मोबाईलवरून पाठवला जातो. त्यानंतर सर्व कामे याच अॅप्लिकेशन नंबरवरून पुढे सुरु राहतात. एवढेच तर हा अॅप्लिकेशन नंबर आरटीओ कार्यालयातील संगणकात देखील सुरक्षित असतो. त्यामुळे गहाळ झालेली कागदपत्र या अॅप्लिकेशन नंबरवरून पुन्हा मिळवणे सहज शक्य आहे. दरम्यान, फॉर्म क्र. २९ व ३०च्या प्रतीदेखील बोजा कमी करण्याच्या आदेशानंतर जोडण्यात आलेल्या व त्यानंतर ‘टीओ मी बी नोटेड’ असे लिहून कार हस्तांतर झाल्याचे समोर आले होते. या संपूर्ण प्रक्रियेत तीन वेळा कागदपत्रांमध्ये छेडछाड झाल्याचे बोलले जात आहे.
६ जानेवारीपासून मुंबईची दक्षता समिती जळगावात
आमदार संजय सावकारे यांची कार परिवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर केल्याप्रकरणी ६ जानेवारीला मुंबईच्या दक्षता समितीमधील सहायक परिवहन आयुक्त दिनकर मनवर व राजेंद्र मदने या दोघांनी जळगावात येऊन आरटीओ कार्यालयात झाडाझडती घेतली होती. या प्रक्रियेत खोटेनगरात राहणाऱ्या अशोक पाटील यांच्या मोबाइलचा वापर झाला आहे. पाटील यांनी आरटीओ एजंट पप्पू भोळे यांनी हा मोबाइल वापरल्याचा दावा केला आहे. त्या अनुषंगाने परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या आदेशाने गुरुवारी दोन अधिकारी जळगावात दाखल झाले. त्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या दालनातील संगणक व फायलींची तपासणी केली. सावकारे यांच्या कार ट्रान्सफर प्रकरणात हलगर्जीपणा झाला असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे.
विजय वाघमारे (9284058683)
















