जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सागर पार्क मैदानाजवळील उच्चभ्रू हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल जुगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली असून जुगार खेळणाऱ्या आठ हाय प्रोफाईल जुगार यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
पप्पू सोहम जैन, अखिल विजय बनवट, भावेश पंजोमल मंधान , मदन सुंदरदास लुल्ला, सुनील शंकरलाल वालेचा, अमित राजकुमार वालेचा, विशाल दयानंद नाथानी, कमलेश कैलासजी सोनी असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे असून साधारण 7 लाख रुपये रोख रक्कम व इतर जुकाराचे साहित्य मोबाईल असा एकूण 19 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी रामानंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून उच्चभ्रू हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर मध्यरात्री पोलिसांनी धाड टाकल्याने जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.