धरणगाव (प्रतिनिधी) दि. ३ जानेवारी, २०२१ रविवार रोजी धरणगाव शहरात विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
महारॅली ची रूपरेषा – धरणी चौक येथे दुपारी ३ वा. राष्ट्रपिता – क्रांतिसुर्य – महात्मा – तात्यासाहेब ज्योतिराव फुले स्मारकापासून सुरुवात होणार आहे. राष्ट्रपिता – क्रांतिसुर्य – महात्मा तात्यासाहेब ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाचे महिलांच्या हस्ते माल्यार्पण केले जाईल. तसेच महिलांचे हस्ते आईसाहेब सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात येणार आहे. यानंतर कोटबाजार येथे भारताचे प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांच्या स्मारकाचे महिलांच्या हस्ते माल्यार्पण केले जाईल. यानंतर परिहार चौकातून छत्रपती आबासाहेब शिवराय स्मारक, तेथे बहुजन प्रतिपालक – कुळवाडीभुषण – छत्रपती आबासाहेब शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे महिलांच्या हस्ते माल्यार्पण केले जाणार आहे. यानंतर डॉ. बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर स्मारक येथे विश्वरत्न – महामानव – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकाचे महिलांच्या हस्ते माल्यार्पण, यानंतर सुवर्ण महोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महारॅलीचा छोटेखानी कार्यक्रमाने समारोप होईल. या महारॅलीचे प्रमुख वैशिष्ट्ये सुत्रसंचालन, प्रास्ताविक, महापुरूषांच्या स्मारकांचे माल्यार्पण, मनोगत व आभार प्रदर्शन या सर्व भूमिका सावित्रीमाईच्या लेकी धरणगाव शहरातील युवती व महीला याच पार पाडणार आहेत. धरणगाव शहरातील सर्वच समाजातील बहुजन बंधु -भगिनी, माता – भगिनी, सर्व शाळा -कॉलेज चे विद्यार्थी – विद्यार्थीनी यांना आवाहन करण्यात येते की, या ऐतिहासिक महारॅलीचा हिस्सा व्हावे, सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन सर्व सावित्री माईंच्या लेकी धरणगाव शहर व तालुका यांनी केले आहे.