TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे वर्चस्व अनुभूती स्कूलच्या विद्यार्थीनींची चमकदार कामगिरी

vijay waghmare by vijay waghmare
September 17, 2025
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव १७ (क्रीडा प्रतिनिधी) – सीआयएससीई सहाव्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत आजच्या सलामीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील खेळाडूंनी आघाडी घेत ११ पदके मिळाले. ५ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांची कमाई केली. त्यात जळगावच्या अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिनींनी पहिल्याच दिवशी तीन पदके मिळवून आपला ठसा उमटवीत महाराष्ट्राच्या वर्चस्वात मोलाची कामगिरी केली. १८ सप्टेंबर रोजी उर्वरित गटातील सामने आणि पारिषोतिक वितरण समारंभ होणार आहे.

अनुभूती स्कूलच्या बॅडमिंटन हॉलमध्ये राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेला आरंभ झाला. आंतरराष्ट्रीय पंच ए. टी. राजीव यांनी मॅट पूजन करून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन केले.पहिल्याच दिवशी खेळाडूंनी दमदार कामगिरी सादर केली. १९ वर्षांखालील ४० किलो गटात बिहार-झारखंडच्या अनिष्का शर्मा आणि कर्नाटक-गोव्याच्या रॅचेल रॉस यांच्यात तर १४ वर्षांखालील ३२ किलो गटात केरळच्या नितारा एस. आणि अंदमान-निकोबार व तामिळनाडूच्या डी. कीर्ती बाला पहिला औपचारिक सामना झाला.स्पर्धेच्या पहिल्या सत्रातील विजेत्यांना जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे उपाध्यक्ष ललित पाटील, सदस्य महेश घारगे, जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तृप्ती तायडे, अरविंद देशपांडे आणि अजित घारगे यांच्या हस्ते सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांनी गौरविण्यात आले.

READ ALSO

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

अनुभूती स्कूलच्या विद्यार्थीनींना तीन पदके

१९ वर्षांआतील वयोगटातील स्पर्धेत जळगावच्या अनुभूती स्कूलची अलेफिया शाकीर हिने ६८ किलो वजन गटात कांस्यपदक मिळवले. तसेच ४९ किलो गटात अनुभूती स्कूलची समृद्धी कुकरेजा हिला कांस्यपदक मिळवले. अनुभूती स्कूलच्या पलक सुराणा हिलाही रौप्य पदक मिळाले.

बुधवारी झालेल्या सामन्यांचा निकाल

१९ वर्षांखालील मुलींच्या ४० किलोच्या गटात सुवर्णपदक उत्तर प्रदेशातील मानवी सिंग हिने मिळवले. पश्चिम बंगालची ज्योत्सा उप्पी हिने रौप्यपदक मिळवले. कांस्य पदक रचेल रिमा (कर्नाटक आणि गोवा) आणि मनप्रित कौर (उत्तर भारत) हिला मिळाले. १९ वर्षांखालील ४२ किलोच्या गटात महाराष्ट्राची अवनी माने हिने सुवर्णपदक जिंकले. रौप्य पदक उत्तर प्रदेशातील दिया सिंग तर कांस्य पदक उत्तर भारतातील भावजित कौर आणि कर्नाटकामधील काव्य हिला मिळाले. १९ वर्षांखालील ४४ किलोच्या गटात सुवर्णपदक उत्तर प्रदेशातील कुंजिका बिंडल हिने पटकवले. रौप्य पदक बिहारच्या अंजेल मर्या हिला तर कांस्य पदक डी.गौडा (कर्नाटक) आणि तामिळनाडूमधील रितिका श्री हिला मिळाले. १९ वर्षांखालील मुलींच्या ४६ किलो गटात कर्नाटक आणि गोवामधील आर.फातिमा हिने सुवर्णपदक मिळवले. या गटात रौप्य पदक उत्तर भारतातील सरबोत कौर तर कांस्य पदक अम्मी (उत्तर प्रदेश) आणि आदिती मिश्रा (बिहार) यांना मिळाले. १९ वर्षांखालील ४९ च्या गटात उत्तर प्रदेशातील माया अग्रवाल हिने सुवर्णपदक तर आंध्र प्रदेशातील श्रेया गुप्ताने कांस्य पदक मिळवले. महाराष्ट्रातील सुमधी कुकरेजा आणि तामिळनाडूमधील हरषिता यांनी कांस्य पदक मिळवले. १९ वर्षांखालील ५२ किलोच्या गटात उत्तर प्रदेशातील इशाका जैस्वाल हिने सुवर्णपदक मिळवले. रौप्य पदक कर्नाटक आणि गोवामधील प्रिती माने तर कांस्य पदक बिहार आणि झारखंडमधील एस.घोष आणि महाराष्ट्रातील जिनी शहा यांना मिळाले. १९ वर्षांआतील ५५ किलोच्या गटात उत्तर प्रदेशातील आर्या बाजपेयी हिने सुवर्णपदक तर आंध्र प्रदेशातील बी.रेड्डी हिला रौप्य पदक मिळाले. कांस्य पदक महाराष्ट्रातील सावी तिवार आणि उत्तर भारतातील प्रणीत कौर यांना मिळाले. १९ वर्षांखालील ६८ किलोच्या गटात उत्तर प्रदेशातील आराध्य सिंग हिने सुवर्ण तर कर्नाटक आणि गोवामधील चारिथा हिने रौप्य पदक जिंकले. कांस्य पदक बिहारमधील महिमा सिंग आणि महाराष्ट्रातील अफिया हिला मिळाले.

१४ वर्षांच्या ३२ किलोच्या मुलींच्या गटात महाराष्ट्रातील तनिष्का डिगे हिने सुवर्णपदक मिळवले. कर्नाटक आणि गोवामधील साची हंगल हिने रौप्य तर आराध्य वर्मा (उत्तर प्रदेश) आणि केरळमधील नितरा हिने रौप्यपदक मिळवले. १४ वर्षांच्या मुलींच्या २९ किलोच्या गटात कर्नाटक-गोवाची नयना प्रिया हिने सुवर्णपदक तर महाराष्ट्रातील अरल कासरे हिने रौप्य पदक मिळवले. या गटात उन्नती (बिहार आणि झारखंड) अनुष्का (आंध्र प्रदेश व तेलंगणा) यांनी मिळवले.

फोटो-
DSC0 4477- राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंसोबत अरविंद देशपांडे आणि अजित घारगे, महेश घारगे आणि इतर मान्यवर.

DSC0 4227- राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत मॅट पूजन प्रसंगी नाराळ फोडताना आंतरराष्ट्रीय पंच ए.टी.राजीव सोबत अरविंद देशपांडे आणि अजित घारगे व इतर.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMaharashtra dominates on the first day of the National Taekwondo Championship

Related Posts

क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रत्नागिरी येथे होणाऱ्या ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अॅकॅडमीच्या खेळाडूंची निवड !

June 11, 2023

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

October 8, 2025

‘एससीओ’ परिषद: जिनपिंग यांच्यासह पंतप्रधान मोदीही उपस्थित राहणार!

November 6, 2020

नशिराबादचा आदर्श जिल्ह्यानेच नव्हे तर राज्याने घ्यावा : गुलाबराव पाटील

January 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group