धरणगाव (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील शेतकरी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी आघाडीने आयोजित केलेल्या बंदचा धरणगावात फियास्को झाल्याचे चित्र आज दिसून आले.
सकाळ पासूनच धरणगावातील व्यवसायिक प्रतिष्ठाने सुरळीत सुरु होती. त्यानंतर दुपारी १२ वाजता आघाडीचे पदाधिकारी रस्त्यावर उतरल्यावर काही काळासाठी दुकाने बंद होती.त्यानंतर मात्र, नंतर पुन्हा व्यवहार सुरळीत झाले.
महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काल बैठक घेऊन नियोजन केले होते. मात्र, आज पहाटे पासूनच धरणगावात कुठेही बंदचा प्रभाव दिसला नाही. कोरोनाचा फटका बसलेल्या व्यापाऱ्यांसाठी नवरात्री सुरु असतांना हा बंद नकोसाच होता. दुपारी बारा वाजता राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन, शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख पी.एम.पाटील, गटनेते पप्पू भावे, भागवत चौधरी, कॉग्रेसचे चंदन पाटील, धीरेंद्र पुरभे, बुट्या पाटील, मोहन पाटील, विलास महाजन, देवरे आबा, रतिलाल चौधरी, बाळू जाधव, राहुल रोकडे यांनी व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. मात्र, काही वेळानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाले होते.