पाळधी (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी हत्याकांड प्रकरणी ११ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना पाठिंबा देत लखीमपूर घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये पाळधी गावातील व्यापारी बंधू, ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशात शेतकरी अगदी शांततेत उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून आंदोलन करत होते. परंतु केंद्रीय मंत्र्याच्याच मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली. यात शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याविरोधात केंद्र सरकारने अजूनही कारवाई केलेली नाही. शेतकऱ्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी आणि घटनेचा निषेध म्हणून सोमवारी ११ ऑक्टोबर रोजी बंद पुकारत आहे.