TheClearNews.Com
Tuesday, February 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरणचा ‘बिझनेस टायटन्स’ पुरस्काराने सन्मान

vijay waghmare by vijay waghmare
July 29, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : घरगुती वीजग्राहकांना सुमारे २५ वर्षे मोफत वीज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणचा ‘रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स अवॉर्ड’ने शनिवारी (२६ जुलै) फुकेत (थायलंड) येथे गौरव करण्यात आला. या सन्मानाबद्दल अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री.लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
‘विकसित भारत’चे उद्दिष्ट व भविष्यातील भक्कम अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या सुमारे १५० खासगी कंपन्या व सार्वजनिक उपक्रमाच्या कंपन्यांचे संचालक व प्रतिनिधींसाठी फुकेत येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ज्येष्ठ अभिनेते श्री.बोमन इराणी यांच्या हस्ते महावितरणला पुरस्कार प्रदान करण्यात आला. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री.राजेंद्र पवार व विशेष कार्य अधिकारी श्री.मंगेश कोहाट यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
देशातील १ कोटी घरगुती ग्राहकांना मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी भारताचे मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना जाहीर केली आहे. सुमारे ७५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीतून स्वतःची वीज निर्मिती करण्यासाठी निवासी कुटुंबांना सक्षम करण्यात येत आहे. मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जा राज्यमंत्री सौ.मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनात तसेच अपर मुख्य सचिव सौ.आभा शुक्ला व महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री.लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रात २ लाख ४२ हजार ७१४ घरगुती ग्राहकांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून त्याची क्षमता ९१९ मेगावॅट आहे. तर या योजनेत सहभागी ग्राहकांना आतापर्यंत तब्बल १६८५ कोटी ४२ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या या उल्लेखनीय राष्ट्रीय कामगिरीची दखल घेत महावितरणचा गौरव करण्यात आला.
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत घरगुती ग्राहकांना छतावरील १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी आहे. एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे. गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व कॉमन उपयोगासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.

कॅप्शन : महावितरणचा ‘रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स अवॉर्ड’ने सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते श्री.बोमन इराणी यांच्या हस्ते संचालक श्री.राजेंद्र पवार व विशेष कार्य अधिकारी श्री.मंगेश कोहाट यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

READ ALSO

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
जळगाव

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
Next Post

धरणगावात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक व्हावे, महिलांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ठाकरे गटाला धक्का; दीपाली सय्यदांचा शिंदे गटात प्रवेश निश्चित !

November 9, 2022

भुसावळात तीन लाखांच्या बनावट नोटा जप्त ; तीन संशयित ताब्यात !

September 5, 2024

धक्कादायक : बनावट पाचशेच्या नोटा बॅंकेत जमा करण्याचा प्रयत्न ; पारोळा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

June 1, 2023

कॅफेमध्ये अश्लील चाळे ; चार जोडप्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई !

December 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group