धरणगाव ता. पाळधी (प्रतिनिधी) राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांना काळे झेंडे दाखवणार असल्याची माहिती धरणगाव पोलीस स्टेशनचे पीआय शंकर शेवाळे यांना मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे अरविंद मानकरी घेण्यात आले. दरम्यान, चौकशी करून त्यांना सोडण्यात आले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे जळगाव दौर्यावर असतांना बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात येणार होते. दरम्यान, राज्यपाल यांनी छत्रपती शिवरायाबद्दल खोडसाळ व चुकीचे विधान करून देशातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याने त्यांनी जनतेची माफी मागावी व महाविकास आघाडीच्या १२ विधानपरिषद निर्णय हेतू घेत नसल्याने यासाठी रा.काँ.पा.सा. न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी जिल्हाध्यक्ष व निंबाजी गायकवाड हे काळे झेंडे दाखवणार असल्याची माहिती धरणगाव पोलीस स्टेशनचे पीआय शंकर शेवाळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पाळधी एपीआय गणेश बुवा यांना सतर्क करून सकाळीच मानकरी व सहकारी यांना ताब्यात घेण्याचे सांगितले व सकाळी आठ वाजताच हे.काँ.निकुम व गजानंद महाजन यांनी संबंधितांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध सपोनि गणेश बुवा यांनी धरणगाव पो.स्टे स्थानकात कलम ६८ प्रमाणे कारवाई करून कलम ६९ प्रमाणे आज धरणगाव पो.स्टे. मधून सोडून दिले.