धरणगाव (प्रतिनिधी) कामधेनू गो सेवा समितीतर्फे वेळोवेळी गो सेवेसाठी अनेक मान्यवर जे सेवा देतात त्यांचा यथोचित सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी सकल जैन समाजाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष अजय शेठ पगारिया, महावीर पतसंस्था अध्यक्ष डॉ.मिलिंद डहाळे गट नेते पप्पु भावे, गट नेते कैलास माळी, ॲड. राहुल पारेख, श्रीपाद पांडे, विजय सोनार, रविंद्र बिचवे, राहुल जैन, प्रतीक जैन, प्रशांत देशमुख, बद्रीनाथ भाटिया, अजय महाजन, सिताराम मराठे, रामकृष्ण पाटील, दिपक कोष्टी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच गुलाबराव वाघ यांनी भेट देऊन गो सेवेसाठी केव्हाही व काहीही मदत लागेल ती देण्याचे जाहीर केले. व कैलास माळी यांनी आपला 5 वर्षाचा नगरपालिकेच्या मार्फत मिळणारा भत्ता हा गो सेवा मंडळ यांना देण्याचे जाहीर केले, तसेच विजय ज्वेलर्स चे संचालक विजयशेठ सोनार यांनी त्यांच्या कडून त्यांचे आई व वडील यांच्या स्मृती प्रित्यर्थ दोन दिवस जीव दया चे नकरे जाहीर केले, प्रशांत देशमुख यांनी सुध्धा गो सेवा मंडळाच्या विनंती वरून चारा गोदाम मध्ये मुरूमची आवश्यकता होती. तेव्हा लगेच ट्रॅक्टर उपलब्ध करून मुरूम आणून टाकण्यासाठी सुरुवात करून दिली, त्याबद्दल या सर्वांचे विशेष आभार मानण्यात आले.
या वेळी गो सेवा समितीचे प्रवीण कुमट, सुभाष कटारिया,महेंद्र कोठारी, संजय ओस्तवाल, शांतीलालजी कुमट, अरविंद ओस्तवाल, महेश सावला, रामलाल कुमट, हेमंत ओस्तवाल, सुमित संचेती, हितेश बोथरा, मयूर चोपडा, राजेश पगारीया, दर्शन पगारीया, मुकेश पगारीया, सागर डेडिया, आलोक कुमट, भूषण मेहेर, मनोज मेहेर, दिनेश मेहेर, प्रविण ओस्तवाल, रमेश ओस्तवाल, जितेंद्र ओस्तवाल, विपुल नगरीया, जतिन नगरीया, धिरज कोठारी, गितेश ओस्तवाल, राजमल संचेती, तुषार कुमट, दिपक संचेती, अक्षय मुथा, महेंद्र दुगड, रोहन कटारिया, संकेत कुमट, मयूर रोकडे, सागर बडगुजर, आदी गो सेवा समितीचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी श्रीराम केटर्स चे संचालक उदय महाराज व किसन महाराज यांनी अत्यंत अल्प दरात स्नेह भोजन उपलब्ध करून दिले त्या बद्दल गो सेवा समिती तर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच जगदीश मराठे यांनी सुध्दा अल्प दरात टेन्ट उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार गो सेवा समितीने व्यक्त केले. तसेच गो मातेच्या सेवेसाठी आपण कायम मदत करावी असे विनम्र आवाहन सकल जैन समाजाचे अध्यक्ष अजय शेठ पगारीया व महावीर पतसंस्था अध्यक्ष डॉ.मिलिंद डहाळे यांनी केले आहे.