धरणगाव (प्रतिनिधी) येथील कुस्ती मल्लविद्या महासंघ तांत्रिक समिती प्रमुख पै.संदीप कंखरे यांचा पठ्ठा पै.महेश वाघ यांनी स्टुडंट ऑलम्पिक असोसिएशन महाराष्ट्र संघातर्फे हरीयाणा येथे नॅशनल कुस्ती स्पर्धेत ५५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला. याबद्दल त्यांचा सत्कार लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश वाघ, राहुल रोकडे, बाळू जाधव, पप्पू महाजन, निलेश महाजन, प्रविण महाजन, महेश माळी, अरुण पाटील, ज्ञानेश्वर माळी, अरविंद चौधरी आदी उपस्थित होते.