धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील ३२ वर्षीय महिलेच्या व्हाट्सअँपवर मेसेज आणि कॉल करणे तसेच दुकानासमोर उभं राहून लज्जा वाटेल अशापध्दतीने हातवारे केल्याप्रकरणी एकाविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १२ एप्रिलच्या रात्री एक ते पहाटे ५ वाजेच्या दरम्यान, अमोल दिनकर पाटील याने त्याच्या व्हाट्सअँप नंबर वरुन पिडीतेच्या व्हाट्सअँपवर मेसेज व व्हाट्सअँपवर वॉईस कॉल केले होते. पिडीतेने सकाळी व्हाट्सअँप उघडून पाहीले तेव्हा अमोल याने केलेले मॅसेज डिलेट केलेले दिसले. तसेच सकाळी ७ वाजेचा सुमारास पिडीता आपल्या दुकानावर असतांना अमोल याने दुकानासमोर उभे राहुन पिडीतेच्या मनास लज्जा वाटेल अशापध्दतीने हातवारे केले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात भादवि कलम ५०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ मोती पवार हे करीत आहेत.