TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सासू आणि मेहुण्याला जिवंत जाळले, माथेफिरू जावयाने नंतर स्वतःही उचललं टोकाचं पाऊल !

प्रेम विवाहाचा रक्तरंजित अंत ; मृतदेहांचा झाला अक्षरशः कोळसा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 26, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) माहेरी गेलेली पत्नी नांदण्यासाठी परत येत नसल्याने संतप्त झालेल्या जावयाने झोपेत असलेल्या सासू आणि मेहुण्याच्या अंगावर पेट्रोल टाकून दोघांना जाळून ठार केले. यानंतर स्वतःही पेटवून घेत आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना वरूड तालुक्यातील वंडली येथे रविवारी (२४ सप्टेंबर) मध्यरात्रीनंतर उघडकीस आली. लता सुरेश भोंडे (४७) व प्रणय सुरेश भोंडे (२२, रा. वंडली) अशी मृतांची नावे आहेत. तर आशिष पुरुषोत्तम ठाकरे (२५, रा. वरूड) असे आत्महत्या करणाऱ्या जावयाचे नाव आहे.

घरातून धूर निघत असल्याचे गावकऱ्यांच्या आले निदर्शनास !
रविवारी मध्यरात्रीनंतर १.१५ वाजताच्या सुमारास वंडली येथील रहिवासी लता भोंडे यांच्या घरातून धूर निघत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. थोड्याच वेळात पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. आग विझविल्यानंतर घराची पाहणी केली असता तेथे तीन मृतदेह जळालेल्या अवस्थेत दिसून आले. या मृतदेहांचा अक्षरशः कोळसा झाला होता. घराला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी पोलीस पथक पोहचण्याआधीच भिंत तोडून मागच्या खोलीत झोपलेल्या लता भोंडे यांच्या सासू चंद्रकला (९०) यांना सुखरूप बाहेर काढले.

READ ALSO

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

मुलीचा सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह !
लता भोंडे या सासू चंद्रकला व मुलगा प्रणय यांच्यासोबत राहत होत्या. त्यांच्या मुलीचा सहा महिन्यांपूर्वी आशिष ठाकरे याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. आशिष हा दारू पिऊन त्याच्या पत्नीला सतत मारहाण करीत होता. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी ती माहेरी परत आली. परंतु, तरीही आशिष हा वंडली येथे जाऊन तिला त्रास देत होता. त्यामुळे लता यांनी मुलीला तिच्या मावशीकडे राजुरा बाजार येथे पाठवून दिले होते.

नेमकं काय घडलं !

पत्नी घरी नांदण्यासाठी येत नसल्याने संतापलेला आशिष हा रविवारी रात्री दारू पिऊन सासू लता भोंडे यांच्या घरी गेला. तत्पूर्वी त्याने वाटेत गाडीत पेट्रोल भरताना काचेच्या बाटलीत शंभर रुपयांचे अधिकचे घेतले होते. घरी येताच आशिषने सोबत आणलेल्या पेट्रोल त्यांच्या अंगावर टाकून पेटवून दिले. त्यानंतर त्याने स्वतःसुद्धा पेटवून घेत आत्महत्या केली, असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले.

मावस सासऱ्यांना केला कॉल !
आशिषने वरूड येथील एका मित्राची दुचाकी घेऊन त्यात पेट्रोल भरले. त्याचवेळी त्याने एका प्लास्टिक बाटलीमध्ये वेगळे पेट्रोलसुद्धा घेतले. त्यानंतर त्याने रात्री मित्राला वंडली येथे सोडून मागितले. आत्महत्या करण्यापूर्वी आशिषने त्याचे मावस सासरे दिनेश निकम यांना मोबाइलवर कॉल केला. सासू आणि साळ्याची हत्या केली असून, स्वतः ही आत्महत्या करीत असल्याचे त्याने त्यांना सांगितले, असे तपासात समोर आले.

अशी पटली आशिषच्या मृतदेहाची ओळख !
घटनास्थळाच्या पंचनाम्यादरम्यान दोन मृतदेह हे लता व त्यांचा मुलगा प्रणय यांचा असल्याचे समोर आले होते. परंतु, तिसरा मृतदेह कुणाचा? असा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, घटनास्थळावर आढळून आलेल्या बॅग, जॅकेट, पॅनकार्डवरून तिसरा मृतदेह हा आशिषचा असल्याचे समोर आले.

भजनाचा कार्यक्रमामुळे आरडाओरड ऐकू आली नाही !
रविवारी रात्री वंडली येथील एका गणेश मंडळात भजनाचा कार्यक्रम सुरु होता. सासूला व मेहुणा प्रणव झोपेतच असतानाच त्याने त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून आग लावली. यावेलो दोघांनी जीवाच्या आकांताने आरडाओरड केली. मात्र, भजनाच्या आवाजात ती ओरड कुणाच्या कानी पडली नाही. दोघेही जळून खाक झाल्याचे बघताच त्याने स्वतः लाही संपविले.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
Next Post

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची मोठी कामगिरी ; चोरीच्या नऊ दुचाकींसह तिघं अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशिक विभागातुन आजपर्यंत ८ लाख २४ हजार ६९५ रुग्ण कोरोनामुक्त

May 30, 2021

धरणगाव येथील फेव्हर ब्लॉकचे काम बंद करावे, अन्यथा दुकाने उघडण्यात येतील ; भाजपचा इशारा !

March 29, 2021

केळी पिक शाश्वत ठेवण्यासाठी फ्युजारीयम विल्ट, टी आर -४ रोग व्यवस्थापन काळाची गरज !

July 21, 2024

भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीच्या धडकेत ४ वर्षीय बालिका ठार !

June 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group