TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : लोखंडी मुसळी डोक्यात मारून निर्घृण पत्नीचा खून !

पत्नी बेपत्ता झाल्याचा रचला बनाव, पोलीस तपासात आली धक्कादायक माहिती !

vijay waghmare by vijay waghmare
April 29, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

सटाणा (वृत्तसंस्था) चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात लोखंडी मुसळी मारून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संशयिताने पत्नीची हत्या केल्यानंतर घरात अज्ञात कारणातून झालेल्या झटापटीनंतर पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव रचून पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करून संशयित पती आधार माळी याला बेड्या ठोकल्या, न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. २ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बागलाण तालुक्यातील केरसाणे येथील विवाहिता सरला आधार माळी (वय ३५) यांच्याबरोबर घरात कोणाची तरी अज्ञात कारणातून झटापट झाल्यानंतर त्या घरातून बेपत्ता झाल्याचा बनाव करीत, पती संशयित आधार हरचंद माळी याने त्याच्या मित्रासह गुरुवारी (दि. २५) रात्रीच्या सुमारास सटाणा पोलीस ठाणे गाठले. यावेळी त्याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले की, तो सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कामावरून घरी आला असताना घराचे दोन्ही दरवाजे उघडे होते, घरात त्याची पत्नी सरला ही कोठेही आढळून आली नाही. तिच्या हातातील बांगड्या फुटून काचा पडलेल्या आणि डोक्याच्या पिना, स्कार्फ घरात अस्तव्यस्त पडलेला असल्याने काहीतरी झटापट होऊन ती घरातून बेपत्ता झाली आहे. त्याने पत्नीचा आजू बाजूला व नातेवाईकांकडे शोधही घेतला; परंतु ती मिळून आली नाही. त्यामुळे त्याने पोलिसांत फिर्याद दिली. या तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत केरसाणे गाठले. त्यांच्यासमवेत सहायक निरीक्षक उज्वलसिंह राजपूत व पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने मध्यरात्रीच घटनास्थळी पाहणी केली, तसेच गावचे पोलीस पाटील कांतीलाल सोनवणे व स्थानिकांच्या मदतीने शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी घराच्या बाजूलाच असलेल्या वीस ते पंचवीस फूट खोल खड्यातील डाळिंबाच्या शेतात सरला माळी यांचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
शवविच्छेदनात सरला माळी यांचा मृत्यू डोक्यामध्ये जड व बोथट वस्तूचा मार लागल्याने झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्याने तिचा भाऊ आनंदा पंडित सोनवणे यांनी सटाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवित सरलाचा पती संशयित आधार माळी याची कसून चौकशी केली. यावळी त्याने चारित्र्यावर संशय घेऊन झालेल्या वादात सरला माळी हिच्या डोक्यात व बरगड्यांवर लोखंडी मुसळीने जोरदार प्रहार करून तिला जिवे ठार मारल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितल्याने संशयित आधार माळी यास बेड्या ठोकून न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यास दि.२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, सहायक निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, हवालदार जिभाऊ पवार, राजेंद्र जगताप, योगेश शेवाळे, रूपेश ठोके, नाईक योगेश पवार, नितीन जगताप, शिपाई संतोष चव्हाण, योगेश साळुखे, रवी शिंदे, चालक गणेश गरुड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

READ ALSO

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न !
संशयित माळी हिचा खून केल्यानंतर घराशेजारील खड्ड्यांतील शेतात तिचा मृतदेह नेऊन टाकला. त्यानंतर पत्नीच्या नातेवाईकांना व त्याच्या मित्रांना, तसेच शेतवस्तीवरील लोकांना पत्नीसोबत काहीतरी बरेवाईट घडल्याचे सांगत बनाव करून तिचा शोध घेण्याचे नाटकही केले, तसेच मित्रासोबत सटाणा पोलीस ठाण्यात त्याची पत्नी सरला माळी बेपता झाल्याची खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

श्वान पथक, ठसे तज्ज्ञाच्या मदतीने गुन्ह्याचा उलगडा !
आधार माळी याच्या तक्रारीनुसार घरात झटापटीनंतर सरला माळी बेपता झाल्याच्या घटनेत घातपाताची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला; परंतु सरला माळी यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांचा खून झाल्याचे समोर आल्याने पोलिसांनी उपलब्ध परिस्थिती जन्य पुरावे व तांत्रिक माहितीच्या आधारे या गुन्ह्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला, तसेच श्वान पथक व ठसे तज्ज्ञांचीही मदत घेतली. यातून मिळालेल्या सुगाव्याच्या आधारे काही तासांच्या आत पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करीत संशयित पती आधार माळीच्या मुसक्या आवळल्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeCrimemurder

Related Posts

गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
गुन्हे

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

June 18, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी एक संधी आम्हालाही द्या : करणदादा पाटील यांचे मतदारांना आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ई गर्व्हनंसवर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी : मुख्यमंत्री

June 14, 2021

राणा दाम्पत्याची ठाकरे सरकारने कुंडलीच काढली बाहेर ; तब्बल 23 गुन्हे दाखल !

April 29, 2022

स्वतंत्र प्रभाग समिती कार्यालयासाठी पाठपुरावा करणार; उपमहापौर सुनील खडकेंची माहिती

December 9, 2020

अहिरे बु ॥ येथे ग्रा.पं. सदस्य विजय पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण !

January 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group