मुंबई/जळगाव, दि. ३ जानेवारी: राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विभागाने येत्या १०० दिवसांत राबवायच्या योजनांचा आढावा घेतला. या बैठकीत जल जीवन मिशन स्वच्छ भारत मिशन भूजल ग्रामीण विकास यंत्रणा सह विविध प्रकल्पांचा आढावा घेत पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.*
यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी ग्रामीण भागातील मंजूर पाणीपुरवठा योजना पुर्ण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, शुद्ध पाण्याचा पुरवठा आणि स्वच्छता सुधारणा या प्रमुख बाबींच्या अंमलबजावणीत गती येणे गरजेचे आहे.”
प्रत्येक गावात स्वच्छ आणि सातत्यपूर्ण पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नवीन योजनांची आखणी, सार्वजनिक स्वच्छतेचे दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ठोस उपाययोजना, शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश. पाणी वाचवण्याबाबत जनजागृती वाढवून जलसंवर्धनाला प्राधान्य देण्याच्या सूचना मंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांमध्ये कामाच्या दर्जावर विशेष भर देण्यात आला. “जनतेला दर्जेदार सेवा देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असावा,” असे त्यांनी निर्देश देवुन राज्यातील पाणीपुरवठा व स्वच्छता सुधारण्यासाठी येत्या १०० दिवसांत प्रभावी अंमलबजावणी होईल, असा विश्वास पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यस्तरीय बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, अभियान संचालक ई रवींद्रन यांच्यासह सर्व विभागांचे मुख्य अभियंता अधिकारी उपस्थित होते.