चाळीसगाव (प्रतिनिधी) भाजपा-शिवसेना-रिपाई-रासप-एकलव्य संघटना-रयत क्रांती महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ प्रवास दौऱ्याचा शुभारंभ शनिवारी बहाळ कळमडु गटातील वडाळा-वडाळी येथून करण्यात आला. यावेळी उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण, स्मिताताई वाघ यांच्यासह महायुतीचे आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वडाळा वडाळी, न्हावे, बोरखेडा बु पिराचे, ढोमणे, टेकवाडे, बहाळ रथाचे व कसबे, रहीपुरी, दस्केबर्डी, खेडी व खेडगाव आदी गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. जळगाव लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार म्हणून पक्षाशी एकनिष्ठ अश्या स्मिताताई वाघ यांना बहुमताने निवडून आणत नारीशक्तीचा सन्मान करण्याचा संकल्प यावेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला.