TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रजासत्ताक दिनी कृषी वीज धोरणाचा जागर

खान्देशातील १ लाख ६१ हजार ७०० शेतकऱ्यांनी भरले वीजबिल

The Clear News Desk by The Clear News Desk
January 28, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या कृषिपंप वीजजोडणी धोरणाबाबत महावितरणतर्फे खान्देशातील तिन्ही जिल्ह्यांत जनजागृती करण्यात आली. कृषिपंप वीजबिलात ६६ टक्क्यांपर्यंत सवलत मिळणाऱ्या या योजनेत लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे व त्याद्वारे गावाच्या विकासाला हातभार लावण्याचे आवाहन महावितरणतर्फे ठिकठिकाणी झालेल्या कार्यक्रमांत करण्यात आले. आतापर्यंत खान्देशातील १ लाख ६१ हजार ७०० शेतकऱ्यांनी १६२ कोटी ५० लाख रुपये वीजबिल भरून योजनेचा लाभ घेतला आहे. सुधारित थकबाकीत ५० टक्के सवलत मिळवण्यासाठी येत्या ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी वीजबिल भरणे आवश्यक आहे.

या धोरणाचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी प्रजासत्ताक दिनी कृषी ग्राहकांचे प्रबोधन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कोकण प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी सहव्यवथापकीय संचालक प्रसाद रेशमे व जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत कृषी वीज धोरणाबाबत ठिकठिकाणी महावितरणच्या अधिकारी -कर्मचाऱ्यांनी वीजबिलात मिळणारी सवलत व त्यातून जमा होणाऱ्या रकमेतून स्थानिक विद्युत विकास याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले. प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच महावितरणच्या विविध कार्यालयांत कृषी वीज धोरणाचे वाचन करण्यात आले. तसेच गावोगावी जाऊन शेतकऱ्यांची भेट घेत त्यांना वीजबिल भरण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी जागेवरच वीजबिल भरले, त्यांचा महावितरणतर्फे सत्कार करण्यात आला.

READ ALSO

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खात्यातून पैसे लंपास

या धोरणांतर्गत कृषिपंप वीज ग्राहकांना तात्काळ वीज कनेक्शन देणे आणि दिवसा वीजपुरवठा करणे नियोजित आहे. या योजनेंतर्गत वीजबिलात ६६ टक्क्यांपर्यंत वीज बिल माफीची सवलत देण्यात आली असून, शेतकऱ्यांचे वीज बिल कोरे करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. ग्रामपंचायत स्तरावर पायाभूत सुविधेमध्ये वितरण रोहित्रांची क्षमतावाढ करणे, नवीन वितरण रोहित्र बसविणे, लघुदाब व उच्चदाब वाहिन्यांचे बळकटीकरण करणे अशा स्वरूपाची कामे करण्यात येणार आहेत. कृषिपंपांच्या वसुलीतील ३३ टक्के निधी हा त्याच ग्रामपंचायती क्षेत्रात वापरण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला असल्याने ग्राहकांचा पैसा त्यांच्या सुविधेसाठी तात्काळ वापरता येईल आणि ग्रामपंचायत स्तरावर सुविधा निर्माण करता येतील अशी तरतूद या योजनेत केलेली आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत चालू बिल व सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील ९३ हजार २८८ शेतकऱ्यांनी ९७ कोटी ६१ लाख, धुळे जिल्ह्यातील ४४ हजार ५५५ शेतकऱ्यांनी ३० कोटी ३७ लाख तर नंदूरबार जिल्ह्यातील २३ हजार ८५७ ग्राहकांनी ३४ कोटी ५२ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
गुन्हे

एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खात्यातून पैसे लंपास

May 6, 2026
गुन्हे

पुण्यात मुलाकडे गेलेल्या स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला

May 6, 2026
जळगाव

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

May 5, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 5, 2026
गुन्हे

बेलसवाडी फाटा येथे भीषण अपघात पती-पत्नी ठार

May 5, 2026
Next Post

कोविड रुग्णालयांकडेही वीजबिलाची थकबाकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रावेर तालुक्यात निंभोरा सिम ते पिंप्रीनांदु दरम्यान उद्या संचारबंदी !

October 21, 2023

कौतुकास्पद निर्णय ! तृतीय पंथीयाशी बीडचा तरुण करणार विवाह !

February 23, 2022

ब्रेकिंग न्यूज : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीचं समन्स !

June 27, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार २९ मे २०२३ !

May 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group