TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गाव चलो अभियानात आमदार मंगेश चव्हाण लोंजे गावात मुक्कामी…!

लाभार्थ्याच्या घरी जेवण, शेकोटी पेटवून ग्रामस्थांशी संवाद, रात्री कार्यकर्त्याच्या घरी थांबले...!

The Clear News Desk by The Clear News Desk
February 13, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) केवळ निवडणुका आल्या किंवा लग्न समारंभ, अंत्यविधी असला तरच गावात धावती भेट ही पुढाऱ्यांची ठरलेली असते. मात्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी चक्क आमदार गावाला भेट देतात व रात्रभर मुक्कामी थांबून त्यांच्याशी संवाद साधतात अस आजवर कधी घडलं नव्हतं… मात्र हो हे घडलंय भारतीय जनता पक्षाच्या गाव चलो अभियानाच्या माध्यमातून आणि यात सहभागी होणारे आमदार आहेत.

चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षातील कामांचा लेखाजोखा जनतेपर्यंत मांडण्यासाठी तसेच केलेली विकास कामे यांची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे “गाव चलो अभियान” राबविले जात आहे. जळगाव जिल्ह्यात देखील ग्रामविकास मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते गिरिषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे बूथप्रमुख पासून ते थेट आमदार, खासदार, मंत्री आदी लोकप्रतिनिधी यांनी देखील सहभागी होण्याचे व एक दिवस ग्रामीण भागात मुक्कामी राहण्याचे निर्देश पक्ष संघटने कडून देण्यात आले होते.

READ ALSO

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

त्याअंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील बुथ क्रमांक ३३८ वर स्वतः आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट देण्याचे निश्चित केले त्यानुसार व दि.१० फेब्रुवारी रोजी लोंजे साईनगर या गावाला त्यांनी मुक्काम केला. एवढेच नव्हे तर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी असणाऱ्या कुटुंबाच्या घरी त्यांनी जेवण केले, गावात घरोघरी मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देणारे पत्रक वाटप केले. तसेच भारतीय जनता पक्षाचे चिन्ह असलेले कमळाचे व “फिर एक बार मोदी सरकार” असे भित्तिचित्रे असलेले दिवार लेखन देखील त्यांनी केले. थंडीचे दिवस असल्याने गावात बऱ्याच ठिकाणी शेकोटी देखील पेटविण्यात आली होती. आमदार मंगेश चव्हाण यांनी शेकोटीची ऊब घेत ग्रामस्थांशी संवाद साधला व आपल्या पक्षाचे बूथ प्रमुख व लोंजे साईनगर गावाचे सरपंच बळीराम चव्हाण यांच्या घरी त्यांनी मुक्काम केला.

कोट्यवधींच्या विकासकामांचे केले भूमिपूजन व उद्घाटन, सेवालाल भवन देखील उभारण्याचे दिले आश्वासन !

चाळीसगाव तालुक्यातील लोंजे गावातून आंबेहोळ व साईनगर या दोन स्वतंत्र ग्रामपंचायत आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून विभक्त करण्यात आल्या होत्या. नवीन ग्रामपंचायतींचे हे पहिलेच वर्ष असल्याने त्यांना विकासकामांना निधीची कमतरता पडू देणार नाही असे आश्वासन आमदार चव्हाण यांनी दिले होते. गेल्या ४ वर्षात आपल्या आमदारकीच्या माध्यमातून लोंजे आंबेहोळ व लोंजे साईनगर या दोन्ही गावात मंजूर असलेल्या कोट्यवधींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण देखील त्यांनी केले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर, माजी जि. प.सभापती राजुभाऊ राठोड, कृउबा सभापती कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड, माजी पं. स.उपसभापती सतिश पाटे, तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, अमोल नानकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गोरख राठोड, नमोताई राठोड, सुनील पवार, धनराज तात्या पाटील, विवेक चौधरी, कैलास पाटील, राम पाटील, राजू पगार, संजय कुमावत, लोंजे सरपंच बळीराम चव्हाण, आंबेहोळ सरपंच भरत शेट चव्हाण, जुनोने सरपंच गोरख राठोड, वागले सरपंच रामदास पवार, वलठाण सरपंच सीताराम राठोड, गोरखपुर् उपसरपंच योगेश जाधव, चैतन्य तांडा सरपंच व चेअरमन दिनकर राठोड, शिंदी उपसरपंच व युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गोरख राठोड, बोढरे सरपंच गुलाब राठोड, खेर्डे उपसरपंच ममराज जाधव, सायगव्हाण माजी सरपंच बाबू राठोड, कृष्णनगर उपसरपंच मनोज चव्हाण, वाकडी सरपंच. प्रकाश पाटील, राजणगाव सरपंच प्रमोद चव्हाण सर, विनीत राठोड, बबलू चव्हाण, अविनाश राठोड, वाडिलाल राठोड आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार आपल्या गावात मुक्कामी असल्याने म्हणजे गावात देखील एक उत्साहाचे वातावरण होते. अबाल वृद्ध महिला माता भगिनी यांच्याशी त्यांनी संवाद साधत मोदी सरकारच्या कामाची माहिती दिली. रात्री १० वाजता उशिरा झालेल्या संवाद सभेला शेकडो ग्रामस्थ विशेषतः माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांच्या मागणीनुसार दोन्ही गावांना संत सेवालाल भवन उभारण्यासाठी निधी देण्याचे आश्वासन आमदार चव्हाण यांनी दिले.

मंजूर असलेली विकासकामे खालीलप्रमाणे

१) लोन्जे आंबेहोळ येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे – 20 लक्ष
२) लोन्जे आंबेहोळ येथे सिमेंट रस्ता किंवा पेव्हर ब्लॉक बसविणे. – 15 लक्ष
३) लोन्जे आंबेहोळ येथे स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे करणे ता.चाळीसगाव – 10 लक्ष
३) आंबेहोळ येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना -155 लक्ष
४) लोंजे आंबेहोळ येथे रस्ता सुधारणा करणे -10 लक्ष
५) लोंजे साईनगर येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना -105 लक्ष
६) लोंजे साईनगर येथे स्मशानभूमी व अनुषंगिक कामे करणे -15 लक्ष
७) लोंजे साईनगर येथे सिमेंट रस्ता -15 लक्ष
८) लोंजे साईनगर येथे चौक सुशोभीकरण करणे -13 लक्ष
लोंजे साईनगर येथे रस्ता सुधारणा करणे -10 लक्ष
९) लोंजे साईनगर येथे चौक सुधारणा करणे – 10 लक्ष
१०) लोन्जे ते सांगवी रोड VR-153 – 1 कोटी 20 लक्ष
११) लोन्जे ते जिल्हा बॉर्डर शिव तांडा रस्ता VR–198 – कोटी

राष्ट्रीय महामार्ग 211 ते रांजणगाव लोंजे हा रस्ता ग्रामीण मार्ग असल्याने त्याला निधी आणता येत नाही, त्यामुळे त्याची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती प्रस्तावित केली आहे. त्यामुळे ५ मीटर रुंद रस्ता करता येईल अशी माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
Next Post

संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्गघाटन सोहळ्याचे अशोक जैन यांना निमंत्रण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

झोपेत हाताच्या करंगळीला सर्पदंश ; बालिकेचा मृत्यू !

September 20, 2023

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मौलाना अबुल कलाम आझाद यांना पुण्यतिथी निमीत्ताने विनम्र अभिवादन

February 22, 2021

ग्रामसेवक बबन आप्पा यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा !

June 17, 2022

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण, ट्वीट करून दिली माहिती

April 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group