जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी दोन महिलांसह एका ७ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. २१ जून २०२२ रोजी जळगाव तालुक्यातील एका गावाचे रहिवासी रणजीत जिजाबराव इंगळे, रंजना रणजीत इंगळे दोन्ही यांनी एका कारणावरून 28 वर्षीय महिलेच्या घरात घुसून आले. त्यानंतर रणजित इंगळे यांनी महिलेच्या पतीला मारहाण करून घराबाहेर काढले. त्यावेळी महिलेचे पती हे सदर ठिकाणाहून पळून गेले. त्यांत रंजीत इंगळे याने महिलेची मुलगी त्याचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला व तिस लज्जा उत्पन्न होईल अशा ठिकाणी हात लावला. तसेच रंजना इंगळे हिने महिलेच्या मुलाला चापटा बुक्क्यांनी मारहाण करून दोघांनी महिलेच्या मुलासमोर महिलेच्या परिवारास शिवीगाळ करून महिलेच्या पतीला सोडणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून, शनिपेठ पोलीस स्थानकात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.
७ वर्षीय मुलीचा विनयभंग
यासंदर्भात अधिक असे की, दि. दामोदर पाटील यांनी ७ वर्षीय मुलीला गोड बोलून त्याच्या किराणा दुकानात बोलावून तिच्या गालावर चावा घेवून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव एमआयडीसी पोलीस स्थानकात दामोदर पाटील यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे हे करीत आहेत.
पारोळा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेचा विनयभंग
यासंदर्भात जतीन सुरेश कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २० जून २०२२ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास सुरेश (नाव बदलले) हे त्यांच्या पत्नी सोबत घराच्या छतावर झोपलेले असताना रोहित अरविंद पाटील हा छतावर येवून पत्नीचे तोंड दाबून पत्नीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. सुरेश यांच्या पत्नीला जाग आल्याने रोहित पळून गेला. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात रोहित अरविंद पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स फौ इक्बाल शेख हे करीत आहेत.