भंडारा (वृत्तसंस्था) अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या गुन्हात अडकलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) नेता अखेर भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलिसांना शरण आला आहे. काल रात्री उशिरा त्याने पोलिसात आत्मसमर्पण केले. तब्बल २३ दिवसांच्या कालावधीनंतर आंधळगाव पोलिसांना त्याने आत्मसमर्पित केले आहे. सुमेध श्यामकुवर (Sumedh Shyamkunwar) असे आरोपी नेत्याचे नाव आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला आज कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.
काय आहे प्रकरण?
भंडारा वसतिगृहात राहणाऱ्या दहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर राष्ट्रावादी नेता व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुमेध श्यामकुवर यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. २५ फेब्रुवारी रोजी सुमेधने पीडित मुलीला हॉस्टेलमध्ये नेण्याच्या बहाण्याने आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगरगाव विहीरगाव रोडच्या शिवारात आपली चारचाकी गाडी थांबली आणि पीडित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता.
दुसऱ्यादिवशी २६ फेब्रुवारीला आंधळगाव पोलीस स्टेशनला पीडितेच्या तक्रारीवरून सुमेध श्यामकुवर यांच्यावर पास्को 8 व 354 अन्वये गुन्हा नोंद केलेला होता. त्यात त्यांची गाडी क्रमांक MH 36 H 7009 मारुती सुझुकी वॅगनआर ही आंधळगाव पोलिसांनी भंडारा येथून जप्त केली. या प्रकरणी आंधळगाव पोलिसांनी तपास करत मुलीच्या फिर्यादीवरुन ठाणेदार सुरेश मटामी यांनी कलम 354 व पास्को 8 नुसार गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध घेत होते.
सदर मुलगीही तुमसर तालुक्यातील असून आदिवासी समाजाची असून पीडित मुलगी ही नूतन कन्या विद्यालय भंडारा येथे वर्ग दहावीमध्ये शिकत होती. तर आरोपी सुमेध श्यामकुवर यांचे भंडारा शहरात राजीव गांधी चौकात यशोधन ग्रामीण शिक्षण संस्था द्वारा संचालित महिला समाजमुलीचे वस्तीगृह यामध्ये ती वास्तव्यास होती. सदर मुलगी श्यामकुवर यांच्या मालकीच्या वस्तीगृहात राहत असायची त्या वसतीगृहाचे मालक स्वतः त्या मुलीला जांब येथे चारचाकी गाडीने नेण्यास आले.
अखेर आत्मसमर्पण केलं
शासनाने नुकतेच वसतिगृहात मुला-मुलींना राहण्याची परवानगी दिली असल्याने सदर संचालक बाहेरगावी असलेला मुलींना आणण्यासाठी संपर्क केल्या असल्याचे बोलले जात आहे. त्यातच हे त्यांनी आंधळगाव पोलीस स्टेशन जवळील डोंगरगाव विहीरगाव रोडवर गाडी थांबून पीडित मुलीची छेडखानी केल्याचे आरोप या मुलीने पोलीस स्टेशनमध्ये केला आहे. या प्रकरणी श्यामकुवर याने अखेर आत्मसमर्पण केल्याने रविवारी उशिरा आरोपीला अटक केली आहे.