धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय मोतीअप्पा पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. मोतीअप्पा मुंबई येथील कस्तुरभा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता ना. गुलाबराव पाटील यांची सावली म्हणून ओळखले जाणारे मोतीअप्पा पाटील हे देखील कोरोना बाधित झाले आहेत. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. दरम्यान, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी. तसेच प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन देखील मोतीअप्पा पाटील यांनी केले आहे.