धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील झुरखेडा येथून मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात कांतीलाल प्रताप चौधरी (वय ५३ रा. झुरखेडा ता. धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. २९ मे २०२२ रोजी झुरखेडा येथून १५ हजार रुपये किंमतीची बजाज कंपनीची प्लेटिना १२५ सीसी मोटरसायकल क्रमांक (MH १९ AS ४२२०) ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र कोळी हे करीत आहेत.