धरणगाव (प्रतिनिधी) एकशे सात वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलच्या एनसीसी (राष्ट्रीय छात्र सेना)च्या ओम पाटील, साक्षी काटवे, शितल कट्यारे, अक्षदा लोहार आणि प्रतीक लोहार या पाच विद्यार्थ्यांना नुकतीच सन्मानाची मुख्यमंत्री स्काॅरशीप जाहीर झाली. त्यानिमित्त जळगाव लोकसभा मतदार संघाचे माननीय खासदार उन्मेष भैय्यासाहेब पाटील यांनी पत्र पाठवून या विद्यार्थ्यांचे, शाळेचे आणि एनसीसी अधिकारी डी.एस. पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
विशेष म्हणजे पी.आर.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणारे खासदार उन्मेषदादा पाटील हे आतापर्यंतच्या खासदारात राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून पी.आर.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे मनाचा मोठेपणा दाखवून अभिनंदन करणारे एकमेव खासदार आहेत.