एरंडोल (प्रतिनिधी) ‘एमपीडीए’ कायद्याअंतर्गत सराईत गुन्हेगार नाना उर्फ बुधा उत्तम कोळी (वय ३२, रा. रवंजे ता. एरंडोल) याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ अर्थात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्याची पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी रवानगी करण्यात आली आहे.
नाना कोळी याच्याविरुद्ध एरंडोल, धरणगाव आणि जळगाव शहर पोलिसात गंभीर स्वरूपाचे १० गुन्हे दाखल आहेत. याशिवाय एरंडोल पोलिसांनी त्याच्याविरुद्ध चार वेळेस प्रतीबंधाकात्मक कारवाई केली आहे. नाना कोळी याच्याविरुद्धचा ‘एमपीडीए’चा प्रस्ताव पोलीस निरीक्षक सतिष गोराडे यांनी तयार करुन एलसीबीकडे १७ ऑक्टोंबर रोजी सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नाना कोळीला एक वर्षासाठी स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले.
यानंतर नाना कोळीला एरंडोल पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक,सतीश गोराडे, सहा.पो.निरी. गणेश आहिरे, पोउनी शरद बागल, पोउनी विकास देशमुख, पोहेका राजेश पाटील, अनिल पाटील, पोना/अकील मुजावर, मिनी कुमावत, पोकॉ प्रशांत पाटील, पंकज पाटील अशांनी नाना कोळी याला ताब्यात घेत दि. २५ नोव्हेंबर रोजी पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.
सदरचा एमपीडीए प्रस्ताव जिल्हा पोलिस अक्षीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपअधीक्षक सुनिल नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला होता. तर याबाबतचे कामकाज एलसीबीचे पो.निरी. किसन नजन-पाटील आणि त्यांच्या पथकातील सफो युनूस शेख इब्राहीम, पोहेको सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ जयंत भानुदास चौधरी, पोकॉ ईश्वर पंडीत पाटील अशांनी काम पाहिले.