जळगाव (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सोनाली लक्ष्मणराव इंगळे यांना ‘दलित नाटकांतील आंबेडकरी विचार’ या विषयावरील नावीन्यपूर्ण संशोधनासाठी पीएच.डी. (डॉक्टरेट) ही सर्वोच्च पदवी प्रदान केली आहे.
प्राचार्य डॉ. निशिकांत आलटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाली इंगळे यांनी हे संशोधन पूर्ण केले. त्यांच्या प्रबंधामध्ये दलित नाटकावरील आंबेडकरी विचारांचा प्रभाव आणि त्यातील संवैधानिक चिंतन या संदर्भात सखोल विवेचन करण्यात आले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मार्गदर्शक डॉ. निशिकांत आलटे, मराठी विभागप्रमुख डॉ. दासू वैद्य तसेच कुटुंबीय व मित्र परिवार यांनी कु.सोनाली लक्ष्मणराव इंगळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
















