जळगाव (प्रतिनिधी) मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या वादातून दोन दिवस छापेमारी केल्यानंतर संबंधीत पथक पुणे येथे रवाना झाले. यानंतर आज या पथकाच्या प्रमुख तथा स्वारगेट पोलीस स्थानकाच्या एसीपी सुजाता चव्हाण यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन या छाप्यांबाबतची माहिती दिली. यात त्यांनी संशयितांच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे मिळाली असल्याचे सांगितले
आरोपी आणि संशयित इसम यांच्या घरातील झडत्या घेण्यासाठी आम्ही जळगावला गेलो होतो. हा गुन्हा २९ आरोपींवर दाखल आहे आणि त्यातल्या काही आरोपींच्या घरांच्या झडत्या घ्यायच्या होत्या. त्याप्रमाणे आम्ही घरांच्या झडत्या घेतल्या आहे. गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने काही महत्वाची कागदपत्रे होती ती ताब्यात घेवून जप्त करण्यात आली असून यापुढील तपास करणार आहे, असं एसीपी सुजाता चव्हाण यांनी सांगितले.
हा गुन्हा २१ जानेवारी रोजी रजिस्टर झाला आहे. आरोपी आणि फिर्यादी जळगावचे आहेत. आरोपी आणि फिर्यादीला पुण्यात बोलवण्यात आलं होत. एका संस्थेच्या संदर्भात हा वाद त्यांच्या आपसात आहे. आणि त्याचे डॉक्युमेंट घेण्यासाठी पुण्याला बोलवलं होतं. फिर्यादी पुणेला आल्यानंतर आरोपींनी त्याला किडनॅप केलं आणि त्याला एका घरामध्ये ठेवून त्याला त्रास देवून त्याच्याकडून खंडणी उकळण्यात आली, अशी एकंदर तक्रार आहे. त्याच अनुषंगाने यातील अनेक आरोपी आहे त्याच्यावर यापूर्वी देखील बरेच गुन्हे दाखल आहे. त्यामुळे या गुन्ह्याचे स्वरूप आणि यातील दाखल झालेले गुन्हे यावरून ९ आरोपींना मोक्का लागलेला आहे. मोक्याचा तपास माझ्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलं.
गुन्हा दाखल झालेल्या आहे आणि गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करणार आहे. परंतू तपासाअंती किती आरोपी निष्पन्न होतात हे आता सांगता येत नाही. पण याच्यात मोठया प्रमाणात आरोपींवर गुन्हा दाखल झालेला आहे.