जळगाव (प्रतिनिधी) थोर स्वातंत्र्य सेनानी व प्रखर राष्ट्रभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टीने अभिवादनाचा कार्यक्रम नेताजी सुभाषचंद्र बोस दरवाज्या जवळ आयोजित केला होता. कार्यक्रमातील नेताजींचे प्रतिमा पूजन खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केले तर अध्यक्ष म्हणून डॉ.व्ही.आर. तिवारी (माजी जिल्हाध्यक्ष भाजप) लाभले, व प्रमुख वक्ते म्हणून बापूसो प्रा.आर.एन. महाजन (केंद्रीय कार्यकारीणी सदस्य समरसता गतिविधी) होते. नेताजींचा कामाचा गौरव म्हणून त्यांच्या नावाचं प्रवेशव्दार व्हावे यासाठी त्याकाळी प्रवेशद्वाराचे बांधकाम देखील सुरू झाले परंतु काही कारणास्तव बांधकाम बंद करण्यात आले.
कित्येक वर्षांपासून ऐतिहासिक वारसा असलेला सुभाष दरवजा अनेक वर्षांपासून दुर्लक्षित झालेला आहे आणि नगरपालिकेने देखील नेताजींचे नाव असलेल्या या दरवाज्याकडे आतापर्यंत अतिशय दुर्लक्ष केलेले आहे. अनेक वर्षांपासून या नेताजी सुभाषचंद्र बोस दरवाज्याचे अपूर्ण बांधकामाचे स्मरण धरणगावातील नागरीकांना व्हावे यासाठी भारतीय जनता पार्टीने नेताजींच्या जयंतीचे निमित्त साधत नवीन नामफलकाचे अनावर खासदार उन्मेषदादा पाटील, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. व्ही.आर.तिवारी, प्रा.आर.एन. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खासदार उन्मेषदादा यांनी नेताजींच्या नाव असलेल्या अपूर्ण अवस्थेतील दरवाज्यास खासदार निधी देऊन पूर्ण करू असे आश्वासन दिले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नामफलकामुळे परीसरात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश महाजन यांनी केले तर आभार सचिन पाटील यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी भाजप जेष्ठ नेते शिरीषअप्पा बयास, ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड संजय महाजन, अँड वसंतराव भोलाने, पुनीलालआप्पा महाजन, प्रकाश सोनवणे, शेखर पाटील, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष निर्दोष पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक शरद अण्णा कंखरे, कडुअप्पा बयास, भालचंद्र माळी, गुलाब मराठे, युवा मोर्चा अध्यक्ष भूषण धनगर इत्यादीसह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.