TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ठेवी परत करेपर्यंत दरवर्षी रकमेवर सहा टक्के व्याज द्या ; बीएचआर पतसंस्थेला ग्राहक न्यायालयाचे आदेश

The Clear News Desk by The Clear News Desk
January 24, 2022
in कोर्ट, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेत २८ लाख रुपये ठेव व ४८ हजार रुपये बचत खात्यात ठेवलेल्या दाम्पत्यास पैसे परत मिळेपर्यंत दोन्ही रकमांवर दरवर्षी सहा टक्के दराने व्याज देण्यात यावे, असे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले आहेत. तसेच शारीरिक मानसिक त्रासापोटी १० हजार रुपये नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी ५ हजार रुपये द्यावे, असाही आदेश न्यायालयाने दिला आहे.

जामनेर येथे राहणाऱ्या कासाबाई व सीताराम लोटू पाटील या दाम्पत्याने सन २०१०मध्ये भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को ऑप. क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआरमध्ये २८ लाख रुपये ठेव ठेवली होती. तसेच ४८ हजार रुपये बचत खात्यात ठेवले होते. या दाम्पत्याने वेळोवेळी येणाऱ्या योजनांत पैसे ठेवलेले होते. सन २०१४ पासून त्यांच्या ठेव पावत्यांची मुदत पूर्ण झाली. यानंतर दाम्पत्याने पैसे परत मिळवण्यासाठी बीएचआरच्या मुख्य शाखेत पायपीट केली. परंतु त्यांना प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे मिळाली. पतपेढी अवसायनात गेली असल्याने पैसे परत मिळणार नाहीत असे त्यांना सांगण्यात आले.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

प्रत्येक वर्षाला सहा टक्के प्रमाणे व्याज द्यावे

अखेर या दाम्पत्याने २ मार्च २०२० रोजी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. प्रभारी अध्यक्षा पूनम मलिक व सुरेश जाधव यांच्यासमोर ही सुनावणी झाली. यात दोन्ही बाजूच्या युक्तिवादाअंती न्यायालयाने पाटील दाम्पत्याच्या बाजूने निकाल दिला. त्यांच्या ठेव पावत्या मॅच्युअर्ड झालेल्या असल्याने देय रक्कम बीएचआरने परत करावी. मुदत ठेवीचा कालावधी संपल्यापासूनच्या प्रत्येक वर्षाला सहा टक्के प्रमाणे व्याज द्यावे. बचत खात्यातील ४८ हजार रुपयांवरही दरवर्षी सहा टक्के व्याज द्यावे. तक्रारदारांना शारीरिक मानसिक त्रासापोटी १० हजार रुपये नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पाटील दाम्पत्यातर्फे भुसावळ येथील अॅड. राजेश उपाध्याय यांनी काम पाहिले.

ठेवीदारांसाठी आशादायी निकाल

बीएचआरच्या राज्यभरातील ८२ शाखांमध्ये गैरव्यवहार, अपहार, फसवणूक झाल्याचे गुन्हे दाखल आहेत. कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याने तत्कालीन संचालक, अवसायक यांच्यासह अन्य लोकांवर गुन्हे दाखल असून, अनेक जण सध्या कारागृहात बंदी आहेत. अशात ग्राहक न्यायालयाने पाटील दाम्पत्याच्या अर्जावर दिलेला निकाल ठेवीदारांसाठी आशादायी ठरणार आहे. व्याज नको पण मूळ रक्कम तरी परत मिळावी अशा मनःस्थितीत असलेल्या ठेवीदारांना ग्राहक न्यायालयाच्या या निकालाने मोठा दिलासा मिळेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Bhr

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

Gold Price Today : सोन्याची किंमत वाढली ; जाणून घ्या.. आजचा दर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संजू नवाल यांची एरंडोल तालुका जातीय सलोखा शांतता समिती सदस्यपदी नियुक्ती

June 13, 2021

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

April 26, 2026

महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र रचलं जातंय : असदुद्दीन ओवेसी

April 27, 2022

बोदवड येथे जैन बांधवांचा मूक मोर्चा !

December 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group