TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबाद नगरपरिषदेची अधिसूचना जारी : पालकमंत्र्यांनी पाळला शब्द !

दोन वर्षांचा पाठपुरावा यशस्वी पाठपुरावा ; नशिराबादच्या विकासासाठी कटीबध्द : ना. पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
June 30, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे नगरपरिषद अस्तित्वात आली असून आज याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तर, जळगावच्या तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जून महिना अखेर पर्यंत नगरपरिषद अस्तित्वात येणार असल्याचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेला शब्द हा खरा ठरवला असून येथे आता अन्य नगरपालिकांसोबत निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नशिराबाद हे जळगाव तालुक्यातील सर्वात मोठे शहर असून ते कधी काळी खूप मोठी बाजारपेठ होती. ब्रिटीश काळात नशिराबादला जळगावपेक्षा जास्त महत्व होते. काळाच्या ओघात जळगाव प्रगतीत खूप पुढे निघून गेले तरी नशिराबाद हे खूप मोठे व महत्वाचे शहर मानले जाते. येथे आजवर १७ सदस्यांची मोठी ग्रामपंचायत कार्यरत होती. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात येथे नगरपरिषदेच्या निर्मितीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन दिले होते. या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न सुरू केले. कोविडमुळे यात काही महिने विलंब झाला. मात्र गत वर्षाच्या अखेरीस नगरपरिषदेची प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान, ग्रामपंचायतीची निवडणूक आली. लवकरच नगरपरिषद होणार असल्याने गावकर्‍यांनी अभूतपुर्व एकी दाखवत या निवडणुकीत भागच घेतला नाही. येथे फक्त एक सदस्य अविरोध निवडून आल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती.

READ ALSO

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

दरम्यानच्या काळात नशिराबाद नगरपरिषदेसाठीची तयारी जोराने सुरू होती. यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद याच्यातर्फे स्वतंत्र प्रस्ताव पाठविण्यात आले होते. नगरपरिषदेसाठी स्थानिक नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या. यात एकानेच घेतलेल्या आक्षेपालाही प्रशासनाने समाधानकारक निराकरण केले. यातच काही दिवसांपूर्वी पाकलमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जून महिन्याच्या अखेरीस नगरपरिषद होणार असल्याचे सूतोवाच केले होते. या अनुषंगाने आज नशिराबाद नगरपरिषदेची अधिसूचना निघाली आहे. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार निवडणूक होईपर्यंत जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पालकमंत्र्यांच्या भगीरथ प्रयत्नाला यश

या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, मी नशिराबदकरांना नगरपरिषदेचा दिलेला शब्द पाळला आहे. या शहराच्या विकासासाठी आम्ही कटीबध्द आहोत. आगामी निवडणुकीत शहरवासी आम्हाला कौल देतील हा पूर्ण विश्‍वास आहे. आजचा दिवस हा नशिराबादच्या इतिहासातील सोन्याचा दिवस असून आम्ही याचे मन:पूर्वक स्वागत करत आहोत. नगरपरिषद झाल्यामुळे नगरविकास खात्याच्या रस्ते व पायाभूत सुविधांच्या सर्व योजना या शहरासाठी मंजूर करण्यात येणार आहेत. यामुळे नशिराबादला नवीन वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचेही ना. पाटील यांनी आवर्जून नमूद केले. नशिराबाद नगरपालिकेच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितादादा पवार, नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आभार मानले आहेत.

नशिराबादेत शिवसैनिकांचा जल्लोष

दरम्यान, नगरपरिषदेच्या नोटिफिकेशनचे वृत्त येताच नशिराबादकरांनी याचे जल्लोषात स्वागत केले आहे. शिवसैनिकांनी जोरदार आतषबाजी करून याचे स्वागत केले. शहराच्या विकासाला यामुळे गती मिळणार असल्याचा आशावाद नागरिकांनी व्यक्त करत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

जळगाव बनला सर्वाधीक नगरपालिकांचा जिल्हा !

महाराष्ट्र शासनाने आज नशिराबाद नगरपरिषद स्थापनेची उदघोषणा जाहीर केली. मनपा सह नशिराबाद ही जळगाव जिल्ह्यातील २० वी नागरी स्थानिक स्वराज्य संस्था ठरली असून महाराष्ट्र सर्वात जास्त नागरी स्वराज्य संस्था असलेला जिल्हा म्हणून जळगाव जिल्ह्याची नोंद झाली आहे. नशिराबाद शहराला ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतुन वगळून नगर विकास विभागाच्या अखत्यारीत समाविष्ट केल्याने यापुढे नगर विकास विभागाच्या सर्व योजनांचा लाभ नशिराबाद शहराला मिळणार आहे. याशिवाय जिल्हा नियोजन अंतर्गत देखील भरीव निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने नशिराबाद शहराचा विकास होण्यास मदत होणार आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद नगरपरिषद होण्यासाठी नगर विकास मंत्री यांचेकडे सतत पाठपुरावा केला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
Next Post

..अखेर डॉ. किंनगेंनी 'त्या' तक्रारदाराकडून जादा घेतलेले अडीच लाख केले परत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व रेडप्लस ब्लड बँकेच्यावतीने मोफत अस्थिरोग व आरोग्य तपासणी शिबीर

November 29, 2021

राम मंदिर निधी संकलन अभियानाचा समारोप फैजपूर ते श्री क्षेत्र सुना सावखेडा पदयात्रेने

February 22, 2021

डॉ. उल्हास पाटलांचा काँग्रेस कमिटीच्या प्रदेशउपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

September 1, 2021

अनिल देशमुखांच्या निवासस्थानांवर ईडीची छापेमारी, शरद पवार म्हणतात, आम्हाला चिंता वाटत नाही !

June 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group