TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रवादीत नाराजीनाट्य?; जळगावात प्रदेशाध्यक्षांसमोरच गटबाजीचे दर्शन

The Clear News Desk by The Clear News Desk
February 14, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बैठकीत जाहीर भाषणात उघडपणे फलकावरील फोटोवरुन माजी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी माजी गुलाबराव देवकरांबाबत नाराजी प्रकट केली. इतकेच नव्हे तर नेत्यांमधील मतभेद मिटवा असे आवाहन केल्याने राष्ट्रवादीमधील गटबाजी प्रदेशाध्यक्षांसमोरच चव्हाट्यावर आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोरच जाहीर मेळाव्यात जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली. कार्यक्रमाच्या बॅनरवर जाणीवपूर्वक फोटो डावलल्याच्या मुद्द्यावरून नेत्यांमध्ये नाराजी नाट्य रंगले. हा प्रकार माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद होत असल्याचे जयंत पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी संतापात हातवारे करत नेत्यांना खाली बसण्याच्या सूचना केली. दरम्यान, कालच (शुक्रवारी) जयंत पाटलांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर माजीमंत्री एकनाथ खडसे यांचा फोटो न लावल्याच्या कारणावरून गटबाजीचे वादळ उठले होते. त्यावर पडदा पडून काही तास उलटत नाही; तोच पुन्हा बॅनरवरील ‘फोटो’ची नाराजी उफाळून आली. विशेष म्हणजे, दोन्ही प्रकारात माजीमंत्री गुलाबराव देवकर केंद्रस्थानी राहिले.

READ ALSO

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेदरम्यान जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात शनिवारी दुपारी जळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत हा प्रकार घडला. बैठकीत जाहीर भाषणात बॅनरवरील फोटोवरून माजी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी माजीमंत्री गुलाबराव देवकरांबाबत नाराजी प्रकट केली. इतकेच नव्हे तर, नेत्यांमधील मतभेद मिटवा, एकमेकांमध्ये मनभेद असल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा प्रभाव ओसरला आहे, असे त्यांनी सांगितल्याने राष्ट्रवादीमधील गटबाजी प्रदेशाध्यक्षांसमोरच चव्हाट्यावर आली.

ग्रामीण मतदारसंघातील गटबाजी उघड

या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगाव शहर व ग्रामीण मतदारसंघातील पक्ष संघटनाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांकडून कार्यकारणीची माहीती जाणून घेतली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना धरणगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी जळगाव ग्रामीण विभागात सुरुवातील राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. मात्र, नेत्यांमध्ये मतभेद झाल्याने ताकद कमी झाल्याची माहीती दिली. तसेच गुलाबराव देवकरांकडे उंगलीनिर्देश करीत व्यासपीठावरील फलकावर देखील आमचे फोटो लावले नसल्याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली. तसेच नेत्यांना मतभेद मिटविण्या सांगा अशी सूचनाही त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे केली.

छोट्या छोट्या विषयांवरुन नाराजी व्यक्त करू नका – गुलाबराव देवकर

ज्ञानेश्वर महाजन बोलत असताना गुलाबराव देवकर यांनी थेट माईकचा ताबा घेतला. ‘अशा छोट्या छोट्या विषयांवरुन नाराजी व्यक्त करू नका, धरणगाव तालुक्यात मी माझ्या खर्चाने लावलेल्या फलकांवर तुमचा फोटो लावला’ असे देवकरांनी यावेळी सांगितले. दोन्ही नेते एकमेकांचे खुलासे करत असल्याने गोंधळ झाल्याचे पाहून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त करत नेत्यांना शांत बसण्यास सांगितले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे’निमित्त गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. काल शनिवारी यात्रेच्या समोरोपाच्यावेळी जळगाव शहर व ग्रामीण विभागाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या व्यासपीठावर मंत्री जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतिष पाटील, मनिष जैन, संतोष चौधरी, दिलीप वाघ, आमदार अनिल पाटील,रोहीणी खडसे, ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
Next Post

'आंदोलने नकोत, मग काय हवे? लोकशाहीतले सुनसान रस्ते ! : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कंगनाचा पद्म पुरस्कार रद्द करावा ; कंगनाच्या ‘त्या’ वक्तव्यावरून नीलम गोऱ्हेंची मागणी

November 11, 2021

आठ महिन्यांत वीजचोरीची ५१०३ प्रकरणे उघडकीस

December 16, 2021

‘तृणमूल’ला मोठा हादरा, ममतांचे विश्वासू सुवेंदू अधिकारी यांचा शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये

December 19, 2020

जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय नाॅन कोविड रूग्णालय म्हणून घोषित ; जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आदेश

July 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group