जळगाव (प्रतिनिधी) आज अयोध्यानगर परिसरातील कौतीक नगर येथे जळगाव काँग्रेस पार्टी जिल्हा महानगरतर्फे जिल्हा महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महानगर चिटणीस अमोल सोनार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यता नोंदणी अभियान राबविले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड. रोहिणीताई खडसे खेवलकर (माजी चेअरमन जे.डी.सी.सी. बँक, जळगाव) होत्या. तर कार्यक्रमाचे उदघाटन गुलाबराव देवकर (चेअरमन जे.डी.सी.सी. बँक जळगाव) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तद्नंतर रोहिणीताई खडसे व गुलाबराव देवकर यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेचे लहान मोठे काम करून सदैव जनतेशी संपर्कात रहावे अशी सूचना त्यांनी केली. सदर कार्यक्रमात २४६ नागरिकांची सदस्यता नोंदणी करण्यात आली.
याप्रसंगी अशाेकभाऊ लाडवंजारी (जळगाव जिल्हा महानगर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी, प्रदेश चिटणीस ऐजाजभाई मलिक, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष वाल्मिक पाटील, अर्बन सेल जिल्हाध्यक्षा अश्विनी देशमुख, जिल्हा महानगर उपाध्यक्ष राजू मोरे, अमोल कोल्हे, भगवान सोनवणे, यशवंत पाटिल, अकिल पटेल, जिल्हा महानगर सरचिटणीस सुनील माळी, दिलीप माहेश्वरी, विशाल देशमुख, अँड. सचिन पाटिल, रवी देशमुख, सुशील शिंदे, राहुल टोके, संजय जाधव, जितेंद्र चांगरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कौतिक नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.