जळगांव प्रतिनिधी anc : जेवण्यासाठी पार्सल घेण्यासाठी मामासोबत दुचाकीवर जात असलेल्या एका ९ वर्षीय बालकाला भरदार डंपरने चिरडल्याची घटना अजिंठा चौकात घडली आहे. तर सोबत असलेली त्याची बहीण आणि मामा हे किरकोळ जखमी झाले आहे. दरम्यान या घटनेमुळे जळगाव शहरातील संतप्त नागरिकांनी उभ्या डंपरला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार देखील घडला आहे. योजस धीरज बऱ्हाटे (वय-९ रा.लीला पार्क, अयोध्या नगर)असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.
योजेस हा मुलगा आपले आई-वडील आणि बहीण भक्ती धीरज बऱ्हाटे (वय १३) यांच्यासोबत आयोध्या नगरातील लीला पार्क परिसरामध्ये वास्तव्याला होता. बुधवारी २५ डिसेंबर रोजी त्यांचा भादली येथील मामा योगेश हरी बेंडाळे हे त्यांच्या घरी आले होते. संध्याकाळी जेवणाचे पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे हे भाची भक्ती आणि भाचा योजस त्याच्यासोबत दुचाकीने कालिंका माता चौकातून जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत युजेस बऱ्हाटे हा चिमुकला जागीच ठार झाला. आता त्याची बहीण भक्ती आणि मामा योगेश बेंडाळे हे किरकोळ जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच अजिंठा चौकात उभा असलेला डंपर संतप्त नागरिकांनी पेटवून दिला. जमाव आक्रमक होत असल्याचे बघून पोलिसांनी जमावाला पंगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.
घटनास्थळी जळगाव शहराचे आमदार राजू भोळे यांनी देखील नागरिकांसोबत बराच वेळ ठिय्या आंदोलन केले.