जळगाव (प्रतिनिधी) ‘ईडी’ ची चौकशी सुरू असून त्यावर बोलणे सद्या उचीत होणार नाही. चौकशी पूर्ण झाल्यावर मी बोलेल अशी प्रतिक्रिया एकनाथराव खडसे यांनी दिली. ‘ईडी’च्या चौकशीनंतर आज राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे मुंबईवरून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे त्यांच्या फॉर्म हाऊसवर आले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी खडसेंची भेटी घेवून त्यांच्याशी चर्चा केली.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्यावर भोसरी एमआयडीसी येथील जमीन खरेदी प्रकरणी आरोप झाले आहे. या जमीन खरेदी प्रकरणी त्यांचे जावाई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक झालेली आहे. तर एकनाथराव खडसे यांची ईडीने नऊ तास चौकशी केली असून त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना चौकशी संदर्भात समन्स दिले आहे. ‘ईडी’च्या चौकशीनंतर आज मुक्ताईनगर येथील त्यांच्या फॉर्म हाऊसवर ते आले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली.
















