धरणगाव (प्रतिनिधी) मध्यप्रदेशच्या आधारे महाराष्ट्र शासनाने निवडणुकी आधी ओबीसी आरक्षण जाहीर करूनच निवडणुका घ्याव्यात अशी मागणी माजी नगराध्यक्ष पी एम पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्रमध्ये नगरपालिका निवडणूक आरक्षण जाहीर करण्यात आले परंतु महाराष्ट्रातील अनेक न.पा.मध्ये कोणत्याही प्रकारे उत्साह दिसून आला नाही. ओबीसी आरक्षणाची निवडणुका घेणे हा एक प्रकारे ओबीसी बांधवांवर अन्याय आहे धरणगाव न.पा आरक्षण 13 जून रोजी निघाले 23 पैकी फक्त 2 वार्ड मध्ये 1 अनुसूचित जाती व 1 मागासवर्गीय हे 2 वार्ड सोडले तर 21 ठिकाणी 50 टक्के पुरुष व 50 टक्के महिला असे चित्र राहील आणि हे सर्व संपूर्ण महाराष्ट्रात राहील धरणगाव निघालेल्या आरक्षण सोडतील 23 जागा नगरसेवकांच्या आहेत परंतु आरक्षणाच्या वेळी मोजून 10 ते 12 पदाधिकारी उपस्थित होते. याचा अर्थ ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकीमध्ये कोणताही उत्सव राहणार नाही महाविकास आघाडीसह विरोधी पक्ष सुद्धा आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये असे ठामपणे सांगत आहे. मग हे आरक्षण जाहीर झाले कसे या संदर्भात धरणगाव प्रांत विनय गोसावी यांना पी एम पाटील यांनी विचारले असता वरून कार्यक्रम आल्यामुळे आम्ही ही सोडत काढत आहोत परंतु निवडणुकीआधी आदेश आलेत तर पुन्हा बदल केले जातील. मध्यप्रदेशच्या आधारे महाराष्ट्र शासनाने निवडणुकी आधी ओबीसी आरक्षण जाहीर करूनच निवडणुका घ्याव्यात अशी मागणी माजी नगराध्यक्ष पी एम पाटील यांनी केले असून यासंदर्भात निवडणूक आयुक्त महाराष्ट्र शासन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी कार्यालय, धरणगाव नगरपालिका यांना लेखी स्वरुपात मागणी करणार असल्याचे पी एम पाटील यांनी सांगितले आहे.