नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आज देशात देशात कोरोनाबाधितांची संख्या ७० लाखांवर पोहोचली आहे, तर ६० लाख ७७ हजार ९७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७० लाख ५३ हजार ८०७ इतकी झालीय.
शनिवारी ८६ हजार ७१२ लोकांनी डिस्चार्ज देण्यात आला आणि ९०६ जणांचा मृत्यू झाला. देशात सध्या ८ लाख ८२ हजार ५४२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर एकूण मृत्यूसंख्या १ लाख ८ हजार ३५६ झाली आहे. मागील २५ दिवसांतील आकडेवारी पाहिल्यास असे दिसते की नवीन रुग्ण आणि मृत्यूचे पीक संपली आहे. एका दिवसात सर्वाधिक उपचार घेतलेले आणि बरे होणारे रुग्णही याच काळात राहिले. दुसरीकडे सर्वात जास्त कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्या २ लाख २१ हजार १५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात शनिवारी ३०८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.















