TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलीस निरीक्षक विठ्ठल ससेंनी पिडीत महिलेसह मला अश्लील शिवीगाळ केली ; सामाजिक कार्यकर्त्या वैशाली झाल्टेंचा आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2021
in गुन्हे, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एका पिडीत महिलेच्या अन्यायासंबंधी दाद मागण्यासाठी पोलीस स्थानकात गेल्यावर आज शनिपेठचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांनी आपणास व अन्यायाग्रस्त तरुणीस अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या वैशाली झाल्टे यांनी केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पोलीस निरीक्षक ससे यांच्याविरुद्ध तक्रार करणार आहेत. तसेच ससे यांना निलंबित न केल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा देखील झाल्टे यांनी दिला आहे. दरम्यान, झाल्टे यांनी यासंदर्भात एक फेसबुक लाईव्ह करत गृहमंत्री तसेच खा. सुप्रियाताई सुळे यांना टॅग  केले आहे.

 

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

याबाबत वैशाली झाल्टे यांनी म्हटले आहे की, अन्यायग्रस्त महिला ही वैशाली झाल्टे यांच्याकडे तक्रार घेवून आल्या होत्या. त्यानुसार दोन वर्षापूर्वी तिला एका मुलाने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्याशी लग्न केले. दोन वर्ष ते एकत्रित राहिले. परंतु दोन वर्षानंतर तिला सोडून निघून गेला. ती महिला पोलीस स्टेशनला सुद्धा गेली. पण पोलिसांनी तिला हाकलून लावले. त्यानंतर ती माझ्याकडे आली. त्यानुसार अन्यायग्रस्त महिलेला घेऊन शनिपेठ पोलीस स्टेशनला गेल्यावर तेथे अगोदरच या महिलेची सासू पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या दालनात उपस्थित होती.

 

वैशाली झाल्टे यांनी पोलिस निरीक्षक ससे यांना सांगितले की, सदर महिलेचे त्या मुलासोबत लग्न झालेले आहे. आपण मुलाला आणि त्यांच्या कुटुंबियांना मुलीला सन्मानाने घरी न्यायावयास समज द्या. परंतु पोलिस निरीक्षक ससे हे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलिस निरीक्षक ससे हे झाल्टे यांना म्हणाले की, ही मुलगी दोन वर्ष त्या मुलासोबत राहिली म्हणजे त्याची बायको झाली का?. त्या मुलाचा एक महिन्यापूर्वी साखरपुडा झाला आहे. या महिलेचा त्या मुलाशी काहीही संबंध नाही. त्यावर झाल्टे म्हणाल्या की, खरं तर तुम्ही चौकशी केल्याशिवाय त्यांची बाजू घेऊन बोलू शकत नाही. तुम्ही अगोदर तक्रार नोंदवून घ्या. तपासानंतर आपल्याला कळेल की, काय खरं आणि काय खोटं?. यावर पोलीस निरीक्षक ससे हे वैशाली झाल्टे यांना म्हणाले की, तू जास्त शहाणपण करू नको. तुच जास्त माजलेली दिसतेस एका मिनिटात तुझा माज मी उतरवून टाकीन. एवढेच नव्हे तर अश्लील शिवीगाळ केली, असा आरोप झाल्टे यांना केला आहे.

 

हा सर्व प्रकार झाल्यावर पोलीस निरीक्षक ससे यांनी महिलेची कोणतीही तक्रार नोंदवून न घेता आपल्या कार्यालयाला कुलूप लावून निघून गेले. झाल्टे म्हणाल्या की, पोलीस स्टेशन मध्येच महिलांना अशी वागणूक मिळत असेल तर इतरांकडून काय अपेक्षा करणार? पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे सारख्या लोकांमुळे महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा मलीम होत आहे. त्यांना त्वरित निलंबित केले पाहिजे. जर निलंबित केले नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा वैशाली झाल्टे यांनी दिला आहे. दरम्यान, याबाबत पोलीस निरीक्षक श्री. ससे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

 

सीसीटीव्ही फुटेज तपासा 

 

माझे पोलीस अधीक्षकांना आवाहन आहे की, कदाचित हा प्रकार खोटा आहे, असे वाटत असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज चेक करावे. तसेच मला अशी शंका आहे की, पोलीस निरीक्षक यांना ‘त्या’ मुलाच्या आई-वडील किंवा बहीणकडून पैसे घेतले असल्याचा आरोप देखील झाल्टे यांनी केला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

समता शिक्षक परिषदेच्या चोपडा तालुका अध्यक्षपदी अर्जुन कोळी यांची निवड !

January 19, 2024

जवखेडेसिम येथे हिंस्र प्राण्याने पाडला जनावरांचा फडशा !

September 27, 2022

वाणी समाज संचालक मंडळाने दिव्यांग मुलाला दिली अनोखी दिवाळी भेट !

November 18, 2020

धाडसी घडफोडी; २ लाखांचा ऐवज लांबवला

November 24, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group